ETV Bharat / state

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काटेकोरपणे नियोजन करा : जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर

पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूक मुक्त, निर्भय आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने पार पाडण्यासाठी नियुक्त अधिकारी, कर्मचारी यांनी निवडणूक आयोगाच्या आणि कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर निर्देशाप्रमाणे काटेकोरपणे नियोजन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केले आहे.

पंढरपूर निवडणूकीची तयारी
पंढरपूर निवडणूकीची तयारी
author img

By

Published : Mar 29, 2021, 12:12 PM IST

पंढरपूर - पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूक मुक्त, निर्भय आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने पार पाडण्यासाठी नियुक्त अधिकारी, कर्मचारी यांनी निवडणूक आयोगाच्या आणि कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर निर्देशाप्रमाणे काटेकोरपणे नियोजन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केले आहे.

पोटनिवडणुक तयारीची आढाव बैठक...
पंढरपूर विधानसभा पोट निवडणूक यांच्या तयारीबाबत प्रांताधिकारी कार्यालय येथे आढावा घेण्यात आला. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी गजानन गुरव, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी सुशिल बेल्हेकर, स्वप्निल रावडे, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, गटविकास अधिकार रवीकिरण घोडके, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, निशिकांत प्रचंडराव, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.एकनाथ बोधले, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. अरविंद गिराम, नायब तहसिलदार मनोज श्रोत्री, सुधाकर धाईंजे, एस.पी.तिटकारे उपस्थित होते.

हेही वाचा - 'पोलीस खात्याचे नेतृत्व फक्त 'सॅल्यूट' घेण्यासाठी नसते', खासदार राऊतांचा सरकारला घरचा आहेर

मतदारांची जागृती करण्यासाठी नाविन्यपूर्ण उपक्रमांचा अवलंब करा
निवडणूक कोरोनाच्या कालावधीत होत असल्याने नियुक्त अधिकारी कर्मचारी तसेच मतदार यांच्या सुरक्षिततेची काळजी घेण्यासाठी आरोग्याच्या दृष्टीने मतदान केंद्रावर आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. मतदान केंद्राची पाहणी करुन आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करुन द्याव्यात. निवडणूक कालावधीत कायदा सुव्यवस्था अबाधित रहावी, यासाठी निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात. तसेच निवडणूक नियुक्त सर्व अधिकारी आणि विभागांनी नेमून दिलेली कामे समन्वयाने व काटेकोरपणे करावे अशा सूचनाही जिल्हाधिकारी शंभरकर यांनी यावेळी दिल्या. तसेच मतदारांची जागृती करण्यासाठी नाविन्यपूर्ण उपक्रमांचा अवलंब करावा, विविध माध्यमातून लोकांच्या पर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

हेही वाचा - औरंगाबादेत बंदी असूनही खासदार इम्तियाज जलील काढणार मोर्चा

जिल्हाधिकारी शंभरकर यांच्या पोटनिवडणुकी संदर्भात सूचना
विधानसभा मतदासंघातील एकूण मतदार, मतदार केंद्रे, एक खिडकी योजना, भरारी पथक, सी व्हिजील ॲप, ऐंशी वर्षावरील जेष्ठ नागरिक, दिव्यांग मतदार संख्या व त्यानुसार करावयाचे नियोजन, कोरोना बाबत घ्यावयाची काळजी , निवडणुकीच्या अनुषंगाने आवश्यक मनुष्यबळ, मतदान अधिकारी कर्मचारी यांना देण्यात येणारे प्रशिक्षण याबाबत बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. विधानसभा पोट निवडणूकीच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या उपाययोजनेची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी गजानन गुरव यांनी दिली. बैठकीनंतर जिल्हाधिकारी शंभरकर यांनी निवडणूक नियंत्रण कक्ष, शासकीय गोडाऊन येथील स्ट्राँग रुम, निवडणूक साहित्य ठेवण्यात येणाऱ्या जागेची पाहणी करुन आवश्यक त्या सूचना दिल्या.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.