सोलापूर - शहरातील मुबशरीन पठाण या महिलेचे एक वर्षीय बाळाचे अपहरण झाले होते. त्याबाबत अपहरणाची तक्रार द्यायला गेल्यावर पोलिसांनी ताटकळत बसवले. शेवटी मुबशरीन (सध्या रा. लोकमान्य नगर, होटगी रोड, सोलापूर) यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना मदतीची आर्त हाक दिली. त्यांच्या हाकेला गृहमंत्री देशमुख धावून आले. त्यांनी या प्रकरणाचा ताबडतोब तपास करा, असे आदेश पोलीस आयुक्तांना दिले. तेव्हा विजापूर नाका पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत, त्या बाळाला शोधलं आणि मुबशरीन यांच्याकडे सोपवलं.
विजापूर नाका पोलीस ठाण्यात ताटकळत बसविले आणि परत पाठविले
मुबशरीन पठाण या महिलेने आपल्या बाळाचे अपहरण झाले आहे. अशी तक्रार देण्यासाठी 15 डिसेंबर रोजी गेल्यावर पोलिसांनी त्याला ताटकळत बसविले आणि परत पाठविले, अशी माहिती अपहरण झालेल्या बाळाच्या आई मुबशरीन यांनी दिली. पोलीस आपल्या तक्रारीची दखल घ्यावयास तयार नसल्याचे पाहून शेवटी मुबशरीन यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना फोन करून मदतीची याचना केली.
घरगुती वादातून बाळाचे अपहरण
मुबशरीन पठाणचा विवाह मुस्तफा पठाण (माढा) यासोबत झाला आहे. घरगुती वादातून मुबशरीन पठाण या माहेरी आल्या होत्या. पती मुस्तफा पठाण हे आपले आतेभाऊ जिलानी मुजावर यासोबत 15 डिसेंबर रोजी मुबशरीन याच्या माहेरी आले होते. ते मुलगा ईस्माइल याला घेऊन थोडा वेळ थांबले आणि काही वेळाने जिलानी मुजावर हा मुलाला घेऊन तिथून पोबारा झाला. ही सर्व घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली.
बाळाला पोलीस ठाण्यात आणले आणि...
पोलिसांनी जिलानी मुजावर यावर अपहरणाचा गुन्हा दाखल केला. तेव्हा शुक्रवारी 18 डिसेंबर रोजी मुस्तफा पठाण याने ते बाळ विजापूर नाका पोलीस ठाण्यात आणून सोडले. आपल्या बाळाला पाहताच आई मुबशरीन यांना आनंद झाला.
हेही वाचा - अखेर नरभक्षक बिबट्याला ठार मारण्यात यश; शार्पशूटरने घातल्या गोळ्या
हेही वाचा - नरभक्षक बिबट्याचा खात्मा करणारे डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील यांचे अकलूजमध्ये जंगी स्वागत