ETV Bharat / state

टेम्पो-दुचाकी अपघातात एकाचा मृत्यू

author img

By

Published : Nov 3, 2020, 4:00 PM IST

Updated : Nov 3, 2020, 5:55 PM IST

पंढरपूरमध्ये टेम्पो आणि दुचाकीच्या अपघातामध्ये दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. पुणे रस्त्यावर हा आपघात झाला. टेम्पोने दुचाकीला पाठीमागून धडक दिली. भागवत नागणे असे या दुचाकीस्वाराचे नाव आहे.

One dies in a two-wheeler accident
टेम्पोे -दुचाकी अपघातात एकाचा मृत्यू

पंढरपूर - टेम्पो आणि दुचाकीच्या अपघातामध्ये दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना पंढरपूरमध्ये घडली आहे. पुणे रस्त्यावर हा आपघात झाला. टेम्पोने दुचाकीला पाठीमागून धडक दिली. या आपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. भागवत नागणे असे या दुचाकीस्वाराचे नाव आहे.

अपघाती टेम्पोचालक फरार

पंढरपूर - पुणे या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सध्या सुरू आहे. हे काम आवताडे कन्स्ट्रक्शन कंपनीला देण्यात आले आहे. याच कंपनीच्या मालकीच्या टेम्पोने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वाराचा जागेवरच मृत्यू झाला. दरम्यान अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांकडून दोन्ही वाहने ताब्यात घेण्यात आली आहेत. संबंधित टेम्पोचालक फरार असून, त्याचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

अपघातानंतर बेशिस्त वाहतुकीबद्दल नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. वाहतुकीला शिस्त लावली गेली नाही तर, कंपनीची वाहने या रस्त्यावर चालू देणार नाही. असा इशारा नागरिकांनी दिला आहे.

Last Updated : Nov 3, 2020, 5:55 PM IST

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.