सोलापूर - नॅशनल थर्मल पाॅवर कॉर्पोरेशन सोलापूर (एनटीपीसी) यांनी जिल्हा प्रशासन यांच्या समवेत लॉकडाऊन दरम्यान उपासमार होत असलेल्या मजूरांना अन्न धान्य वाटप करण्यात आले आहे. एनटीपीसीच्या 800 कामगारांना एनटीपीसी-सोलापुरचे मुख्य महाव्यवस्थापक एस. गौरी शंकर, सोलापुरचे उप जिल्हाधिकारी ज्योती पाटील, भुसंपादन विभागचे उप जिल्हाधिकारी शैलेश सुर्यवंशी आणि प्राथमिक आरोग्य केंद्र होटगीच्या प्रमुख संगीता नलावडे यांच्या हस्ते अन्नधान्याचे वाटप करण्यात आले.
यावेळी अन्न धान्य वाटपावेळी नामदेव अपार (महाप्रबंधक-ओ.एण्ड.एम) व्यंकटय्या कोटकडी (महाप्रबंधक) रजत चौधरी (महाव्यवस्थापक) जॉन मथाई (अतिरिक्त महाव्यवस्थापक) आदी उपस्थित होते.
हेही वाचा.... आनंदाची बातमी! सहा महिन्याच्या बाळाचा कोरोनावर विजय
सोलापूर जिल्हा प्रशासनाच्या सांगण्यानुसार या आधीही सोलापूर येथून कर्नाटकला स्थलांतरीत होणाऱ्या 100 मजूरांना एनटीपीसी-सोलापूरने खाद्यान्न पाकिटे वितरीत केली होती. तसेच कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता एनटीपीसी-सोलापूरच्या सृजना महिला मंडळाच्या वतीने होटगीच्या प्राथमिक आरोग्य केंद्राला मास्क, सॅनिटायझर, हन्ड ग्लॉव्हज, साबण इ. वैद्यकीय वस्तुंचा पुरवठा करण्यात आला आहे.