सोलापूर - बार्शी विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या निवडणूक खर्चाची दुसरी तपासणी 16 ऑक्टोबरला खर्च निरिक्षक राघवेंद्र पी. यांच्या उपस्थितीत तहसील कार्यालयात करण्यात आली. विविध कारणांसाठी मतदारसंघातील सहा उमेदवारांना नोटीस बजावण्यात आली आहे.
हेही वाचा - बार्शीचे अपक्ष उमेदवार राजेंद्र राऊतांची जीभ घसरली; मिरगणे यांच्यावर आक्षेपार्ह टीका
तपासणीवेळी अनुपस्थित असल्यामुळे कनिष्क सुरेश शिंदे, नागनाथ चावण या उमेदवारांना नोटीस बजावण्यात आली आहे. तर, शिवसेनेचे उमेदवार दिलीप सोपल, अपक्ष उमेदवार राजेंद्र राऊत आणि राष्ट्रवादीच्या निरंजन भुमकर यांना निवडणूक खर्चामध्ये तफावत आढळून आल्याने नोटीस देण्यात आली आहे. याचवेळी जगन्नाथ मुंडे या उमेदवाराला निवडणूक खर्च बँकेमार्फत न केल्याने नोटीस देण्यात आली आहे. या सर्व उमेदवारांना नोटीस मिळाल्यानंतर 48 तासांच्या आत खुलासा करण्याविषयी खर्च निरिक्षकांनी निर्देशित केले आहे.