माढा (सोलापूर) - कोरोनाचा वाढता संसर्ग ध्यानी घेऊन माढा शहरामध्ये असणाऱ्या "सेवाभावी संस्था" ना कोरोना केअर सेंटर सुरू करण्यात यावी, अशी मागणी नगराध्यक्षा मीनल साठे यांंनी पालकमंत्री दत्ता भरणे यांच्याकडे केली आहे. यासह अन्य मागण्यांचे निवेदन मीनल साठे यांनी पालकमंत्री दत्ता यांच्याकडे दिले.
पंचायत समिती कार्यालय कुर्डुवाडी येथे कोरोना विषयी आढावा बैठक पालकमंत्री दत्ता भरणे यांच्या उपस्थितीत शनिवारी पार पडली. यावेळी नगराध्यक्षा मिनल साठे यांनी पालकमंत्री यांना शहराच्या कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा मांडला.
माढा ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर व कर्मचारी यांची भेडसावत असलेली अपुरी यंत्रणा, टेंभुर्णी वरून होणारी आॉक्सिजनची कमतरता, चालकाविना ग्रामीण रुग्णालयाची असलेली रुग्णवाहिका आणि यामुळे रुग्णांची होणारी हेळसांड तसेच १०० टक्के लसीकरण मोहीम राबविण्यासाठी ग्रामीण रुग्णालयात येणारा लसीकरणाच्या तुटवडा, लसीकरणाची होणारी गर्दी, लसीकरण करण्यासाठी ऑनलाईन माहिती भरताना येणाऱ्या अडचणी ह्या समस्या प्रकर्षाने पालक मंत्र्यासमोर बैठकीत नगराध्यक्षा साठे यांनी मांडल्या.
नगराध्यक्षा अॅड मीनल साठे -
कोरोनाकाळात करण्यात येणारा खर्च करण्यासाठी नगरपंचायतला निधी उपलब्ध करून द्यावा. शहरासाठी कोरोनाच्या काळामध्ये अहोरात्र काम करणारे सफाई कामगार यांचे वेतन करण्यासाठी सहायक अनुदान उपलब्ध करून द्यावे, प्रधानमंत्री आवास योजनेचा केंद्राचा हप्ता लवकरात लवकर मिळावा, लसीकरण फक्त सरकारी रुग्णालयातमध्ये न करता तेथील गर्दी कशाप्रकारे टाळता येईल यासाठी खासगी हॉस्पिटलमध्ये कशाप्रकारे मोहीम राबवता येईल, हे सुचवत असताना खासगी हॉस्पिटलमध्ये लसीकरण चालू करावे, अशा मागण्या नगराध्यक्षा अॅड साठे यांनी निवेदनातून मांडल्या.