सोलापूर - ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. मंगळवारी दिवसभरात ग्रामीण भागात 148 रुग्ण कोरोनाबाधित आढळले आहे. तर शहरी भागात 78 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. मंगळवारी शहर व ग्रामीण भाग असे एकूण 226 कोरोनाबाधित आढळले आहेत. आजतागायत सोलापुरात एकूण 7 हजार 905 रुग्ण आढळले आहेत.
सोलापूर शहर आणि जिल्ह्यात मंगळवारी एकूण 1 हजार 870 कोरोना चाचणी अहवाल प्राप्त झाले. या अहवालामधून 226 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. मंगळवारी शहर व जिल्ह्यात एकूण 11 कोरोना रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. ग्रामीण भागात मंगळवारी 944 रुग्णांची तपासणी करण्यात आली. यामधून 796 रुग्णांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. 148 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. ग्रामीण सोलापुरात 139 रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. ग्रामीण भागात 7 रुग्ण कोरोना आजाराने दगावले असल्याची नोंद झाली आहे.
सोलापूर शहरात मंगळवारी एकूण 926 रुग्णांची तपासणी करण्यात आली. या तपासणीमधून 848 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर 78 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. शहरात फक्त 45 रुग्णांनी कोरोनावर मात केली. शहरामध्ये कोरोनाग्रस्त रुग्ण उपचार घेत असताना 4 रुग्णांनी आपला जीव गमावला आहे.
जिल्ह्यातील सद्यपरिस्थिती -
एकूण पॉझिटिव्ह रुग्ण
ग्रामीण - 3120
शहर - 4785
एकूण - 7905
मृतांच संख्या
ग्रामीण - 89
शहर - 352
एकूण - 441