ETV Bharat / state

'चंद्रकांत पाटलांची शेतकऱ्यांबद्दल गुर्मीची भाषा, महाविकास आघाडीचा भारत बंदला पाठींबा' - महाविकास आघाडी बातमी

राज्य सरकार पाडण्यासाठी भाजपचे ऑपरेशन लोटस सुरू आहे. मात्र, हा भाजपचा केवळ दिवा स्वप्न असल्याचे मत राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष दीपक साळुंखे यांनी व्यक्त केले.

आमदार दीपक साळुंखे
आमदार दीपक साळुंखे
author img

By

Published : Dec 7, 2020, 9:04 PM IST

सोलापूर - शेतकऱ्यांची कोणतीही मागणी आम्ही मान्य करणार नाही, असे चंद्राकांत पाटील यांनी केलेले विधान अत्यंत दुर्वैदी असून त्यांची ही भाषा गुर्मीची आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष दीपक साळुंखे यांनी केली आहे. तसेच मंगळवारी (दि. 8 डिसें.) बंदला सोलापुरातील काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना या तिन्ही पक्षाच्या वतीने पाठींबा दिला जाणार असल्याचेही साळुंखे यांनी सांगितले.

बोलताना दीपक साळुंखे व संजय शिंदे

महाविकास आघाडीचा ईव्हीएम मशीनवर विश्वास नाही

विधान परिषदेच्या ज्या निवडणूका झाल्या आहेत. त्यामध्ये महाविकास आघाडीला यश मिळाले आहे. बॅलेट पेपरवर मतदान घेतल्यानेच हे यश मिळाले आहे. ईव्हीएम मशीनवर मतदान घेतले असते तर एवढे यश दिसले नसते. म्हणून महाविकास आघाडीचा ईव्हीएम मशीनवर विश्वास नसल्याचे दीपक साळुंखे यांनी सांगितले.

'ऑपरेशन लोटस' हा भाजपचा दिवा स्वप्न

राज्य सरकार पाडण्यासाठी भाजपचे ऑपरेशन लोटस सुरू आहे. मात्र, हा भाजपचा केवळ दिवा स्वप्न असल्याचे मत राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष दीपक साळुंखे यांनी व्यक्त केले.

टाळेबंदीतील वीज बिल माफ करावे - आमदार संजय शिंदे

सर्व पक्षीय नेत्यांकडून वेगवेगळ्या मार्गाने वीज बिल माफीसाठी राज्यात आंदोलन सुरू आहे. त्यावर भाष्य करताना आमदार संजय शिंदे म्हणाले, टाळेबंदीच्या काळातील वीज बिले माफ झालीच पाहिजे. एकीकडे राज्य सरकारसमोर वीज बिल माफीसाठी मोठा पेच निर्माण झाला असताना, दुसरीकडे मात्र महाविकास आघाडीतील आमदार देखील वीज बिल माफीची मागणी करू लागले आहेत.

एमआयएम नेत्यांची लुडबुड

एमआयएम पक्षाची मजबूत बांधणी केलेले नेते तौफिक शेख हे महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत लुडबुड करताना दिसत आहे. एमआयएममध्ये घुसमट होत असताना, तौफिक शेख हे पक्ष सोडून जाणार असल्याचे जाहीर केले. मात्र, यांच्या प्रवेशाचे मुहूर्त अजूनही सापडला नाही. महाविकास आघाडीच्या कार्यक्रमात एमआयएम पक्षाचे नगरसेवक व माजी शहराध्यक्ष लुडबुड करताना दिसून येत आहे.

हेही वाचा - नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याचे आदेश; करमाळ्यात आतापर्यंत घेतले तीन बळी

हेही वाचा - महाविकास आघाडी सरकार पहिल्या चाचणीत यशस्वी - गृह राज्यमंत्री शंभूराजे देसाई

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.