ETV Bharat / state

'पंढरपूरच्या विकासाचा भारत भालकेंचा ध्यास कधीही न विसरता येण्यासारखा'

पंढरपूर मंगळवेढ्याचे आमदार भारत भालके यांचे अकाली निधन झाले. त्यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून अभिवादन करत पवार यांनी भालके यांचे पुत्र भगीरथ यांच्यासह कुटुंबाचे सांत्वन केले.

sharad pawar
sharad pawar
author img

By

Published : Dec 18, 2020, 3:08 PM IST

Updated : Dec 18, 2020, 3:59 PM IST

पंढरपूर - भारत नाना जरी आज आपल्यात राहिले नसले, तरी त्यांचे कर्तृत्व, माणुसकीची भावना आणि पंढरपूरच्या विकासासाठी असलेला ध्यास याचा विसर आपल्याला कधीही पडणार नाही, अशी भावनिक साद राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी घातली. पंढरपूर मंगळवेढ्याचे आमदार भारत भालके यांचे अकाली निधन झाले. त्यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून अभिवादन करत पवार यांनी भालके यांचे पुत्र भगीरथ यांच्यासह कुटुंबाचे सांत्वन केले.

'पंढरपूरच्या सहकार क्षेत्रासाठी नानांचे योगदान मोलाचे'

पंढरपूर येथील पांडुरंग हा या देशातील सामान्य माणसाचा आधार आहे. कष्टकरी, शेतकऱ्यांचा तो देव आहे. त्या पंढरीचा आशीर्वाद ज्याला लाभेल तो भाग्यवान असेल. त्यामुळे पंढरपूर आणि परिसर हा एका दृष्टीने भाग्यवंतांचा परिसर आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. पण ते भाग्य कुठे वळले असेल तर त्याला जागेवर आणण्याचे काम आपल्या सर्वांचे आहे. त्यासाठी सर्वांनी मेहनत करणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले.

'प्रश्न सोडवण्यासाठी असायचा हट्ट'

भारत भालके यांनी पंढरपूर तालुक्यातील सहकारी संस्था असेल, कारखानदारी असेल, पंढरपूर शहर असेल मंगळवेढा तालुक्यातील पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी त्यांचा हट्ट असायचा. या प्रत्येक गोष्टीसाठी त्यांनी आपली चिकाटी ठेवली. त्यामुळे ते आज नाहीत तरी आपल्या सगळ्यांची जबाबदारी ही आहे, की त्यांचे हे अपुरे प्रत्येक स्वप्न पूर्ण करण्याचे प्रयत्न केले पाहिजे. पंढरपूरच्या विकासासाठी औदुंबर पाटील यांनी साखर कारखानदारी विकासासाठी मोठी मोलाची कामगिरी केली. त्याची दखल आपण सर्वांनी घेतली आहे. त्यांच्यानंतर या विभागासाठी जर कोणी काही केले असेल तर त्यामध्ये भारत नानांचे नाव प्रकर्षाने घेतले जाईल, असे ते म्हणाले.

'पोकळी भरून काढण्याचा प्रयत्न करू'

पंढरपूर तालुक्यातील साखर कारखानदारीचे जे अर्थकारण जे बिघडले आहे, त्यातून कारखाना काढून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना काय चांगले देता येईल, या सर्व दृष्टीने त्याच्यावर निर्णय घ्यावे लागतील. तुम्हाला विश्वासात घेवून ते निर्णय घ्यावे लागतील. त्यासाठी विचारविनिमय करू. भालके यांच्या जाण्याने जी पोकळी निर्माण झाली आहे, ती भरून काढण्याचा प्रयत्न करू, असे ते म्हणाले.

भगीरथ भालके यांच्या आमदारकीबाबत सस्पेन्स

भालके यांचे पुत्र भगीरथ यांच्या नावाची घोषणा पवार करतील, असे कार्यकर्त्यांना वाटले होते. मात्र पवार यांनी सांगितले, की आपल्याला एकत्र बसून या विषयावर चर्चा करायची आहे. तत्काळ त्यावर बोलता येणार नाही. त्याचबरोबर आपल्याला सर्वांना बरोबर घेऊन जायचे आहे. विशेष म्हणजे या शब्दावरच पवार यांनी अधिक जोर दिला. यामुळे भागीरथ भालके यांच्या पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाच्या तिकिटावर शंका निर्माण झाली आहे. यावरून भगीरथ भालके यांच्या आमदारकीबाबत सस्पेन्स कायम राहिला आहे.

Last Updated : Dec 18, 2020, 3:59 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.