ETV Bharat / state

Solapur Police Operation Parivartan: सोलापूर पोलिसांच्या ऑपरेशन परिवर्तनला देशपातळीवर पुरस्कार - हातभट्टी मुक्त

सोलापूर येथे पोलिस (Solapur Police) अधीक्षक सातपुते यांनी सप्टेंबर २०२१ पासून 'ऑपरेशन परिवर्तन' (Operation Parivartan) राबवून जिल्हा हातभट्टी मुक्त (Hand furnace free) करण्याचा यशस्वी प्रयत्न केला. त्यासाठी त्यांना 'इंडिया पोलिस वार्डस- २०२२' हा पोलीस दलातील देशपातळीवरील पुरस्कार प्राप्त झालेला आहे. या मोहीमेअंतर्गत त्यांनी ५९४ जणांचे कायमस्वरूपी परिवर्तन करण्यात यश मिळविले.

Solapur Police station
सोलापूर ग्रामीण पोलिस स्टेशन
author img

By

Published : Jul 16, 2022, 5:26 PM IST

सोलापूर: ऑल इंडिया पोलिस समिट आणि वार्ड- २०२२ अंतर्गत १५ जुलै रोजी आयोजित दुसऱ्या ऑनलाइन आवृत्तीत पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी जिल्ह्यात राबविलेल्या 'ऑपरेशन परिवर्तनला' (Operation Parivartan) पुरस्कार जाहीर झाला आहे. सोलापूर ग्रामीण पोलिसांना (Solapur Police) इंडिया पोलिस समिट व वार्डचा पुरस्कार मिळाला आहे. 'इंडिया पोलिस वार्डस- २०२२' हा भारत पोलिस समिट व पुरस्काराचा एक भाग आहे. गुन्ह्यांचे व घटनांचे निराकरण करण्यासाठीची कार्यपध्दती, तंत्रज्ञान सक्षम करण्यासाठी राज्यांमध्ये भारतीय पोलिस दलाअंतर्गत सर्वोत्कृष्ट उपक्रम नोंदवुन त्यांचे कौतूक म्हणून सन्मान केला जातो. पोलिस अधीक्षक सातपुते यांनी सप्टेंबर २०२१ पासून 'ऑपरेशन परिवर्तन' राबवून जिल्हा हातभट्टी मुक्त (Hand furnace free) करण्याचा यशस्वी प्रयत्न केला.

सोलापुरात ऑपरेशन परिवर्तन राबविले: सोलापूर ग्रामीण भागात अनेक जण बेकायदेशीर हातभट्टी दारू तयार करण्याचा व्यवसाय करत होते. पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी सोलापूर ग्रामीण पोलीस दलात पदभार घेताच, त्यांनी 'ऑपरेशन परिवर्तन' संकल्पना आणली. सोलापूर ग्रामीण भागातील १२० गावांमध्ये हा उपक्रम राबविल्या गेला. त्यांनी पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून ८३३ जणांवर ७०७ गुन्हे दाखल केले. आणि जवळपास १ कोटी १० लाख रुपयांचा हातभट्टी दारूचा मुद्देमाल नष्ट केला. तर ५९४ जणांचे कायमस्वरूपी परिवर्तन करण्यात यश मिळविले. त्यामुळे सोलापूर ग्रामीण पोलिस दलास हा पुरस्कार मिळाला आहे.

ग्रामीण भागातील तांडे हातभट्टी मुक्त करण्याचा प्रयत्न:
सोलापूर शहराला लागून असलेल्या अनेक तांड्यात 'ऑपरेशन परिवर्तन' राबविण्यात आले. या तांड्यामध्ये अनेक महिला,तरुण बेकायदेशीर हातभट्टी दारू तयार करण्याचा व्यवसाय करत होते.पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी पुढाकार घेत,या हातभट्ट्या उध्वस्त केल्या.आणि महिलांना व तरुणांना,तरुणींना रोजगार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला.

हेही वाचा: Market Yard Pune : जीएसटीच्या निषेधार्थ व्यापारी आक्रमक; देशभरातील भुसार मार्केट बंद

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.