ETV Bharat / state

महाराष्ट्रातल्या अधिकाऱ्यांनी कन्नड शिकून घ्यावी; 'या' खासदाराने व्यक्त केली अपेक्षा - kudal Sangam

दक्षिण सोलापूर तालुक्यातील कन्नड भाषिक असलेल्या कुडल संगम गावातील तीर्थक्षेत्र असलेल्या संगमेश्वर देवस्थान येथे विकास कामांचे भूमिपूजन सोलापूरचे नवनिर्वाचित खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महाराजांनी हे वक्तव्य केले.

डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी
author img

By

Published : Jun 1, 2019, 8:01 PM IST

सोलापूर- सोलापुरातील अधिकाऱ्यांनी थोडी थोडी का होईना कन्नड शिकून घ्यावी, अशी अपेक्षा सोलापूरचे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी व्यक्त केली आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील दक्षिण सोलापूर तालुक्यातील तीर्थक्षेत्र असलेल्या कुडल संगम येथील विकास कामाच्या भूमिपूजनाच्या समारंभ प्रसंगी त्यांनी हे वक्तव्य केले. कन्नड बहुल असलेल्या गावांमध्ये जास्तीत जास्त भाषणही कन्नड मधून होत असतात. त्यामुळे अधिकाऱ्यांनी थोडी थोडी कन्नड शिकून घ्यावी असे खासदारांनी म्हटलं आहे.

कुडल संगम हे गाव कन्नड भाषिक असल्याने जयसिद्धेश्वर हे कन्नड मधून भाषण करत होते. यावेळी व्यासपीठावर उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांना भाषण समजावे यासाठी भाषण मराठीतून करा, अशी विनंती व्यासपीठावरील एका कार्यकर्त्याने खासदारांना केली. त्यावेळी कन्नड भाषिक असलेल्या गावातील व्यासपीठावरील इतर कार्यकर्त्यांनी मात्र महास्वामी यांनी त्यांचे भाषण हे कन्नड मधूनच करावे, असा आग्रह धरला.

डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी हे कन्नड मधून भाषण करत होते. यावेळी यावेळी व्यासपीठावरील एका कार्यकर्त्याने मराठीतून भाषण करण्याची विनंती केली. यावर अधिकाऱ्यांनी थोडी तरी कन्नड शिकावी अशी अपेक्षा महास्वामींनी व्यक्त केली.

जय सिद्धेश्वर महास्वामी यांची मातृभाषा जरी कन्नड असली तरी त्यांचे इंग्रजी, मराठी आणि हिंदी या तीनही भाषेवर प्रभुत्व आहे. मात्र, व्यासपीठावरील व व्यासपीठा समोरील सर्वजण कन्नड भाषिक असल्यामुळेच महा स्वामींनी कन्नड मधूनच भाषण सुरू ठेवत यापुढे अधिकाऱ्यांनी थोडी थोडी का होईना कन्नड शिकावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.

सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट, दक्षिण सोलापूर तसेच मंगळवेढा तालुक्यातील काही गावे ही पूर्णपणे कन्नड भाषिक आहेत. या तालुक्यातील गावांमध्ये ते शंभर टक्के लोकांची मातृभाषा ही कन्नड आहे. त्यामुळे अक्कलकोट दक्षिण सोलापूरसह सोलापूर शहरातील तीस टक्के भागात कन्नड भाषा सर्वाधिक बोलली जाते. त्यामुळे याठिकाणी दैनंदिन व्यवहारासाठी कन्नड भाषाच वापरली जाते.

लिंगायत बहुल असलेल्या भागांमध्ये कन्नड मातृभाषा असून व्यवहारातही कन्नड भाषा वापरली जाते. कन्नड भाषिक मतदारांमुळेच डॉ. जय सिद्धेश्वर महास्वामीजी हे खासदार म्हणून निवडून आलेले आहेत. त्यामुळे भविष्यकाळात सोलापूरच्या खासदारांना कन्नड भाषेतूनच संवाद साधणे राजकीय दृष्ट्या महत्त्वाचे राहणार आहे. त्यामुळेच कन्नडसह हिंदी, इंग्रजी आणि मराठी या भाषेवर प्रभुत्व असतानादेखील नवीन खासदारांनी अधिकाऱ्यांनाच थोडी थोडी का होईना कन्नड शिकून घ्या, असा सल्ला दिला आहे. त्यांचा हा सल्ला व्यावहारिक आणि राजकीय या दोन्ही दृष्टीकोनातून असल्याचे दिसत आहे.

Intro:R_MH_SOL_01_JUNE_2019_OFFICERS_MUST_LEARN_KANNAD_S_PAWAR

अधिकाऱ्यांनो थोडी थोडी का होईना कन्नड शिकून घ्या,
सोलापूरचे खासदार जयसिद्धेश्वर महास्वामीजी ची अपेक्षा

सोलापूर-
सोलापुरातील अधिकाऱ्यांनी थोडी थोडी का होईना कन्नड शिकून घ्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे सोलापूरचे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामीजी यांनी. महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील तीर्थक्षेत्र असलेल्या कुडल संगम येथील विकास कामाच्या भूमिपूजनाच्या समारंभ प्रसंगी खासदारांनी कन्नड शिकून घेण्याची अपेक्षा व्यक्त केले आहे. कन्नड बहुल असलेल्या गावांमध्ये जास्तीत जास्त भाषणही कन्नड मधून होत असतात. त्यामुळे अधिकाऱ्यांनी थोडी थोडी कन्नड शिकून घ्यावी असे खासदारांनी म्हटलं आहे.

Body:
दक्षिण सोलापूर तालुक्यातील कन्नड भाषिक असलेल्या कुडल संगम गावातील तीर्थक्षेत्र असलेल्या संगमेश्वर देवस्थान येथे विकास कामांचे भूमिपूजन सोलापूरचे नवनिर्वाचित खासदार डॉ जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्या हस्ते करण्यात आले. कुडल संगम हे गाव कन्नड भाषिक असल्यामुळे यावेळी नवनिर्वाचित खासदार हे कन्नड मधून भाषण करत असताना व्यासपीठावर उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांना भाषण समजावे यासाठी भाषण मराठीतून करा अशी विनंती व्यासपीठावरील एका कार्यकर्त्याने खासदारांना केली. त्यावेळी कन्नड भाषिक असलेल्या गावातील व्यासपीठावरील इतर कार्यकर्त्यांनी मात्र महास्वामीजी नि त्यांचे भाषण हे कन्नड मधूनच करावे असा आग्रह धरला. सोलापूरचे नवनिर्वाचित खासदार डॉक्टर जय सिद्धेश्वर महास्वामीजी त्यांची मातृभाषा जरी कन्नड असली तरी त्यांचे इंग्रजी मराठी आणि हिंदी या तीनही भाषेवर प्रभुत्व आहे त्यामुळे महास्वामीजी हे कन्नड सह चार भाषेत बोलू शकतात. मात्र व्यासपीठावरील उपस्थित व व्यासपीठा समोरील सर्वजण कन्नड भाषिक असल्यामुळेच महा स्वामीजींनी कन्नड मधूनच भाषण सुरू ठेवत यापुढे अधिकाऱ्यांनी थोडी थोडी का होईना कन्नड शिकावी अशी अपेक्षा व्यक्त केली.

सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट दक्षिण सोलापूर तसेच मंगळवेढा तालुक्यातील काही गावे हे ही ही पूर्णपणे कन्नड भाषिक असलेली गावे आहेत या तालुक्यातील गावांमध्ये ते शंभर टक्के लोकांची मातृभाषा ही कन्नड आहे त्यामुळे अक्कलकोट दक्षिण सोलापूर सह सोलापूर शहरातील तीस टक्के भागात कन्नड भाषा सर्वाधिक बोलली जाते त्यामुळे याठिकाणी दैनंदिन व्यवहारासाठी कन्नड हीच भाषा वापरली जाते.
लिंगायत बहुल असलेल्या भागांमध्ये कन्नड मातृभाषा असून व्यवहारातही कन्नड भाषा वापरली जाते आणि कन्नड भाषिक मतदारांच्या मुळेच डॉक्टर जय सिद्धेश्वर महास्वामीजी हे खासदार म्हणून निवडून आलेले आहेत त्यामुळे भविष्यकाळात सोलापूरच्या खासदारांना कन्नड भाषेतूनच संवाद साधणे ही राजकीय दृष्ट्या महत्त्वाचे राहणार आहे त्यामुळेच कन्नड स हिंदी इंग्रजी आणि मराठी या भाषेवर प्रभुत्व असतानादेखील नवीन खासदारांनी अधिकाऱ्यांनाच थोडी थोडी का होईना कन्नड शिकून घ्या अशी अपेक्षा केलेली आहे त्यांची ही अपेक्षा व्यावहारिक आणि राजकीय या दोन्ही दृष्टीकोनातून असल्याचं दिसतंय.

Conclusion:बाईट - डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी,
खासदार सोलापूर
(नोट बाईट कन्नड मधील आहे)
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.