सोलापूर - हा देश पंतप्रधान नरेंद्र मोदी चालवतात की मोहन भागवत, असा सवाल खासदार हुसेन दलवाई यांनी उपस्थित केला आहे. ते सोलापुरात बोलत होते.
केंद्रात सत्तापरिवर्तन झाल्यापासून भारतीय राज्यघटनेच्या तत्त्वाला हरताळ फासला जात आहे. नागरिकत्व दुरुस्ती अधिनियम म्हणजेच सीएए कायदा केंद्र सरकारने मंजूर करून त्याची अंमलबजावणी सुरू केली आहे. सदर कायद्याला देशभरातील संविधानप्रेमी, विवेकवादी, पुरोगामी परिवर्तनवादी, धर्मनिरपेक्ष संघटना, पक्ष आणि भारतीय नागरिक जन आंदोलनाद्वारे विरोध करीत आहेत. स्वातंत्र्यानंतर ही एक चांगली गोष्ट घडत असल्याचेही दलवाई यांनी सुरुवातीला सांगितले.
याच पार्श्वभूमीवर जमियत उलमा-ए-हिंद पश्चिम महाराष्ट्र आणि सोलापुरातील समविचारी संघटनांच्यावतीने 'संविधान बचाव, देश बचाव' संमेलनाचे आयोजन करण्यात आले. या संमेलनाच्या निमित्ताने खासदार हुसेन दलवाई सोलापुरात आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन संघ परिवार, मोहन भागवत आणि केंद्र सरकारवर सडकून टीका केली.
हेही वाचा - मंकी हिल-कर्जत स्थानकादरम्यान ‘अप लाइन’ वर तांत्रिक कामांमुळे 'या' गाड्या रद्द
ते म्हणाले, भारतामध्ये सीएए आणि एनआरसीला सर्वजण विरोध करत आहेत. त्यांच्यासोबत असलेलेही काही पक्ष विरोध करत आहेत. मुस्लिमांबरोबर सर्व समाजातील नागरिक व विद्यार्थी मोठ्या प्रमाणात या कायद्याच्या विरोधात उतरले आहे.
हेही वाचा - 'संविधानामुळेच मला जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचा बहुमान'