ETV Bharat / state

धक्कादायक; अकलूजचा एव्हरेस्टवीर निहाल बागवानचा ऑक्सिजन अभावी मृत्यू - मृत्यू

एव्हरेस्टवीर निहाल बागवानने एव्हरेस्ट सर केल्यानंतर त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला. मात्र हा आनंद फार काळ टीकला नाही. खाली उतरताना बेस कॅम्पवर त्याचा ऑक्सिजन न मिळाल्याने मृत्यू झाला.

एव्हरेस्टवीर निहाल बागवान
author img

By

Published : May 24, 2019, 3:53 PM IST

Updated : May 24, 2019, 5:06 PM IST

सोलापूर - अकलूजच्या निहाल बागवान या विराचा एव्हरेस्टची चढाई मोहीम फत्ते करून परतल्यावर ऑक्सिजनचा पुरवठा कमी झाल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. निहालसोबत आणखी 3 गिर्यारोहक होते, त्यांचादेखील ऑक्सिजनचा पुरवठा कमी झाल्याने मृत्यू झाला आहे. ही घटना गुरुवारी सांयकाळी घडली आहे.

Bagwan
एव्हरेस्टवीर निहाल बागवान

श्वसनाच्या त्रासामुळे निहालचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. अकलूज येथील निहाल बागवानच्या घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. मात्र गिरी, शिखरे पादाक्रांत करण्याची त्याची जिद्द मोठी होती. अकलूजच्या मोहिते पाटलांसह अनेक व्यक्ती, सामाजिक संस्थांच्या आर्थिक सहकार्यामुळे निहालने एव्हरेस्ट सर करण्याचे स्वप्न पूर्णही केले. मात्र त्याने पूर्ण केलेल्या स्वप्नांचा आनंद जास्त काळ टिकला नाही. खाली उतरताना काही तासांतच त्याचा मृत्यू झाला.
गुरुवारी 23 मे रोजी निहालने एव्हरेस्ट शिखर सर केले. शिखर सर करून परतलेल्या निहाल बागवानवर नातेवाईक, मित्र मंडळी यांनी कौतुकाचा वर्षाव केला होता. सर्वोच्च शिखर सर केल्याचा आनंद फार काळ टिकला नाही. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे बेस कॅम्प 4 वरच निहालचा मृत्यू झाला.

निहालसोबत आणखी 3 गिर्यारोहक होते. त्यांचादेखील मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. इतर 3 गिर्यारोहकांमध्ये पुण्याची युवती आणि दिल्ली येथील युवती असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

गुरुवारी शिखर सर केल्यावर निहालवर कौतुकाचा वर्षाव झाला होता. सकाळी निहालने एव्हरेस्टवर तिरंगा फडकवला होता. निहाल हा झेंडा फडकवून परत येतानाच त्याच्याकडील ऑक्सिजन संपल्याचे समजते. त्यामुळे ऑक्सिजन अभावी 4 जणांचा गुरुवारी सायंकाळी मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. या गिर्यारोहकांचा मृतदेह अजून सापडला नाही.

Intro:अकलूजच्या एव्हरेस्टवीर निहाल बागवानचा ऑक्सिजन अभावी मृत्यू,
एव्हरेस्टची मोहीम सर केल्यानंतर बेस कॅम्प 4 वर निहाल सोबत 4 गिर्यारोहकाचा मृत्यू

सोलापूर-
अकलूजच्या निहाल बागवान या एव्हरेस्टवीराने एव्हरेस्ट ची चढाई मोहीम फत्ते करून परतल्यावर ऑक्सिजनचा पुरवठा कमी झाल्यामुळे मृत्यू झाला आहे. निहाल सोबत आणखी 3 गिर्यारोहक होते त्यांचा देखील मृत्यू झाला आहे. ही घटना काल सांयकाळच्या सुमारास घडली आहे. Body:श्वसनाच्या त्रासामुळे निहालचा मृत्यू झाला आहे अशी प्राथमिक माहिती आहे. अकलूज येथील निहाल बागवानच्या घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. मात्र गिरी, शिखरे पादाक्रांत करण्याची त्याची जिद्द मोठी होती. अकलूजच्या मोहिते पाटलांसह अनेक व्यक्ती, सामाजिक संस्थांच्या आर्थिक सहकार्यामुळे निहालने एव्हरेस्ट सर करण्याचे स्वप्न पूर्णही केले. मात्र त्याने पूर्ण केलेल्या स्वप्नांचा आनंद जास्त काळ टिकला नाही. काही तासातच त्याचा मृत्यू झाला आहे.
गुरुवारी दिनांक 23 मे रोजी निहाल बागवान याने एव्हरेस्ट शिखर सर केले. शिखर सर करून परतलेल्या निहाल बागवानवर नातेवाईक, मित्र मंडळी यांनी कौतुकाचा वर्षाव केला होता. सर्वोच्च शिखर सर केल्याचा आनंद फार काळ टिकला नाही. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे बेस कॅम्प 4 वरच निहालचा मृत्यू झाला.

निहाल बागवान याच्या सोबत आणखी 3 गिर्यारोहक होते त्यांचा देखील मृत्यू झाला असल्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. इतर 3 गिर्यारोहकामध्ये पुण्याची एक युवती गिर्यारोहक आणि 1 दिल्ली येथील युवती गिर्यारोहक असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
गुरुवारी शिखर सर केल्यावर निहालवर कौतुकाचा वर्षाव झाला होता. सकाळच्या सुमारास निहालने एव्हरेस्टवर तिरंगा फडकविला होता. निहाल हा झेंडा फडकवून परत येत असतानाच त्यांच्याकडील ऑक्सिजन संपल्याचे समजते. त्यामुळे ऑक्सिजन अभावी 4 जणांचा गुरुवारी सायंकाळी 8 च्या सुमारास मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे . 4 गिर्यारोहकाचा मृतदेह अजून सापडला नाही.Conclusion:
Last Updated : May 24, 2019, 5:06 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.