ETV Bharat / state

मुलीकडून परत येणाऱ्या आई व मुलावर काळाचा घाला

सध्या सोलापूर पंढरपूर या महामार्गाचे काम गतीने चालू आहे. त्यामुळे महामार्गातील मोठ्या प्रमाणावर अडथळे निर्माण झाले आहे. यामुळे अपघात वाढत चालले आहेत. त्यामुळे ग्रामस्थांकडून प्रशासनाकडे गतिरोधक बसविण्याची वेळोवेळी मागणी करण्यात येत आहे. मात्र ट्रकची समोरुन धडक झाल्यामुळे आई व मुलाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे पेनुर गावावर शोककळा पसरली आहे.

mother and son died in road accident in pandharpur
मुलीकडून परत येणाऱ्या आई व मुलावर काळाचा घाला
author img

By

Published : May 25, 2021, 5:19 PM IST

सोलापूर - पंढरपूर तालुक्यातील तुंगत टोलनाक्याजवळ सोलापूरहून येणाऱ्या ट्रकने मोहोळच्या दिशेला जाणाऱ्या दुचाकीला भीषण धडक दिल्याने आई व मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. शंकर यल्लाप्पा वाघमोडे (वय 19) शालन यल्लाप्पा वाघमोडे (वय 34) अशी मृतकांची नावे असून सागर यल्लाप्पा वाघमोडे (वय 14 रा. पेनुर ता. मोहोळ) हा गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर पंढरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मुलीकडून परत येत असताना काळाचा घाला..
शालन वाघमोडे या आपल्या दोन मुलांसह पंढरपूर तालुक्यातील सुस्ते येथील मुलीला भेटण्यासाठी गेल्या होत्या. मुलीकडून पेनूरच्या दिशेने परत येताना सोलापूरच्या दिशेने येणाऱ्या इॅथेनॉल ट्रकने वाघमोडे यांच्या मोटर सायकलला जबर धडक दिली. धडक दिल्यानंतर मोटरसायकल पाचशे फुटापर्यंत घसरत गेली. त्यातच शंकर वाघमोडेचा गंभीर दुखापत झाल्यामुळे जागीच मृत्यू झाला तर जखमी झालेल्या शालन वाघमोडे व सागर वाघमोडे यांना उपचारासाठी पंढरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र रुग्णालयात नेताना वाटेतच शालन वाघमारे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर सागरला पंढरपूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले

आई व मुलाच्या अपघाती मृत्यूमुळे पेनूर गावावर शोककळा.
सध्या सोलापूर पंढरपूर या महामार्गाचे काम गतीने चालू आहे. त्यामुळे महामार्गातील मोठ्या प्रमाणावर अडथळे निर्माण झाले आहे. त्यातच अशाप्रकारे होणारे अपघात वाढत चालले आहेत. त्यामुळे ग्रामस्थांकडून प्रशासनाकडे गतिरोधक बसविण्याची वेळोवेळी मागणी करण्यात येत आहे. मात्र ट्रकची समोरुन धडक झाल्यामुळे आई व मुलाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे पेनुर गावावर शोककळा पसरली आहे तर सुस्ते येथील मुलींच्या कुटुंबावर ही दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.