सोलापूर - काँग्रेसच्या नेत्यांना व मला सरकार मानसिक त्रास देत असल्याचा आरोप सोलापूरातील काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी केला आहे. पालकमंत्र्यांना घेराव घातल्याप्रकरणी प्रणिती शिंदे यांच्यावर सोलापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यामुळे आमदार शिंदे यांना दररोज पोलीस ठाण्यात हजेरी लावण्याच्या अटीवर जामीन मंजूर करण्यात आला आहे. पोलीस ठाण्यात हजेरी लावण्यासाठी आल्यावर प्रणिती शिंदे यांनी सरकारवर आरोप केला आहे. आमच्यावर कितीही गुन्हे दाखल झाले तरी आम्ही गोर गरीबांसाठी लढा देतच राहू, असेही प्रणिती शिंदे यांनी यावेळी सांगितले.
सोलापूर शहर मध्यच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूरातील शासकीय रुग्णालयातील दरवाढीच्या विरोधात सोलापूरचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांना घेराव घालत आंदोलन केले होते. या आंदोलनात एक पोलीस जखमी झाला होता. या प्रकरणी सोलापूर पोलिसांनी आमदार शिंदे यांच्यासह काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले आहेत. या गुन्ह्यामध्ये आमदार प्रणिती शिंदे यांनी जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. न्यायालयाने प्रणिती शिंदे यांना जामीन अर्ज मंजूर करताना पोलीस ठाण्यात हजेरी लावण्याची अट घालण्यात आली आहे. न्यायालयाने दिलेल्या निर्णयाप्रमाणे आमदार प्रणिती शिंदे यांनी आज सदर बाजार पोलीस ठाण्याध्ये हजेरी लावली. यावेळी आमदार शिंदे म्हणाल्या की, सरकार आम्हाला मानसिक त्रास देत आहे. सरकारने कितीही त्रास दिला तरी आम्ही गोर गरिबांच्या प्रश्नांसाठी कायम लढा देत राहू.
हेही वाचा - सोलापुरात राष्ट्रवादीकडून मुख्यमंत्र्यांना दाखवले काळे झेंडे