ETV Bharat / state

सोलापूर शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी उजनीतल्या पाण्याचा अपव्यय - जलसंपदा राज्यमंत्री - pune

आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत मोहोळ तालुक्यातील आष्टी उपसा सिंचन योजनेच्या उद्घाटनासाठी राज्याचे जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे सोलापुरात आले होते. त्यावेळी यांनी राज्यातील धरण आणि पाणी परिस्थितीवर भाष्य केले.

जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे
author img

By

Published : Jul 4, 2019, 9:44 PM IST

सोलापूर - शहराला पिण्यासाठी सोडावे लागणाऱ्या पाण्यामुळे उजनी धरणातील पाण्याचे नियोजन कोलमडल्याची प्रतिक्रिया राज्याचे जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी दिली. आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत मोहोळ तालुक्यातील आष्टी उपसा सिंचन योजनेच्या उद्घाटनासाठी शिवतारे सोलापुरात आले होते. त्यावेळी त्यांनी राज्यातील धरण आणि पाणी परिस्थितीवर भाष्य केले.

उजनी धरणातील पाणी परिस्थितीवर जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांची प्रतिक्रिया

राज्यात सर्वाधिक साठवण क्षमता असलेल्या उजनी धरणात यावर्षी ११० टक्के पाणी आले होते. मात्र, या पाण्याच्या नेटक्या नियोजनाअभावी सोलापूर जिल्ह्याला तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागला. त्यामुळे पिण्याच्या तसेच शेतीच्या पाण्याचा तुटवडा निर्माण झाला. शेती पिके नष्ट झाली. शिवाय माढा तालुक्यात गळती दुरुस्तीच्या नावाखाली पाणी पाठविण्यात येत आहे. या गोष्टीकडे लक्ष वेधले असता शिवतारे यांनी सोलापूरला द्याव्या लागणाऱ्या पाण्यामुळे उजनी धरणातले पाणी वाया जात असल्याची प्रतिक्रिया दिली.

सध्याच्या सरकारकडून यंदा मुंबईत बसून उजनीतल्या पाण्याचे नियोजन केले गेले. शिवाय जलसंपदा विभागातील अनियमिततेमुळे ११० टक्के भरलेले धरण रिकामे झाले. याची संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात चर्चा आहे. पण त्याचे ठोस उत्तर देणे आतापर्यंत तरी सरकारला जमलेले नाही. म्हणून येणाऱ्या पावसाळ्यानंतर तरी योग्य नियोजन व्हावे, अशी अपेक्षा सोलापूर जिल्हावासीय करत आहेत.

Intro:सोलापूर : सोलापूर शहराला पिण्यासाठी सोडावं लागणाऱ्या पाण्यामुळं उजनी धरणातील पाण्याचं नियोजन कोलमडल्याची प्रतिक्रिया राज्याचे जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी इटीव्ही भारतशी बोलताना दिलीय.
आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत मोहोळ तालुक्यातील आष्टी उपसा सिंचन योजनेच्या उद्घाटनासाठी शिवतारे आज सोलापूरात आले होते.त्यावेळी यांनी राज्यातील धरणं आणि पाणी परिस्थितीवर भाष्य केलं.

Body:राज्यात सर्वाधिक साठवण क्षमता असलेल्या उजनी धरणात यावर्षी 110 टक्के पाणी आलं होतं.मात्र या पाण्याच्या नेटक्या नियोजनाअभवी सोलापूर जिल्ह्याला तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागला.त्यामुळं पिण्याचं, शेतीच्या पाण्याचा तुटवडा निर्माण झाला.शेती पिकं नष्ट झाली.शिवाय माढा तालुक्यात लिकेज दुरुस्तीच्या नावाखाली पाणी पाठविण्यात येत आहे.या गोष्टीकडे लक्ष वेधले असता शिवतारे यांनी सोलापूरला द्याव्या लागणाऱ्या पाण्यामुळं उजनी धरतलं पाणी वाया जात असल्याची प्रतिक्रिया दिलीय...

Conclusion:सध्याच्या सरकारकडून यंदा मुंबईत बसून उजनीतल्या पाण्याचं नियोजन केलं गेलं.शिवाय जलसंपदा विभागातील अनियमिततेमुळं 110 टक्के भरलेलं धरण रिकामं झालं.याची संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात चर्चा आहे.पण त्याचं ठोस उत्तर देणं आतापर्यंत तरी सरकारला जमलेलं नाही.म्हणून येणाऱ्या पावसाळ्यानंतर तरी योग्य नियोजन व्हावं अशी सोलापूर जिल्हावासीय करत आहेत.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.