सोलापूर - सरगम चौकासमोरील नवीन पुलावरून दुधाचा 1 टँकर पुलाचा कठडा तोडून चंद्रभागा नदी पडल्याची घटना घडली. तब्बल 20 हजार लिटर दूध या टँकरमध्ये भरले होते. त्यानंतर 12 तास उलटूनही हा टँकर काढण्यात प्रशासनाला यश आले नाही. टँकरमध्ये किती जण होते? हे अद्याप समजले नाही.
पुलावरून गुरूवारी सकाळी साडेसात वाजता तिरुमला दुध डेअरीचा कुर्डुवाडीहून पंढपूरकडे निघालेला दुधाचा टँकर (टीएन-88-d-8241) चालकाचे नियंत्रण सुटल्याने चंद्रभागा नदीत कोसळला.
हेही वाचा - सोलापुरात परतीच्या पावसाची जोरदार बॅटींग
टँकरचा शोध घेण्यासाठी स्थानिक खासगी व्यक्तींची प्रशासनाने मदत घेतली. तिरुमला कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी सांगितल्यानुसार टँकरमध्ये 1 चालक होता. मात्र, प्रत्यक्षात बघणाऱ्या लोकांनी 3 ते 4 लोक बुडताना दिसल्याचे सांगितले आहे. उजनी आणि वीर धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे भिमा नदीला पूर आला आहे. त्यामुळे टँकर काढण्यात प्रशासनाला अडचणी येत आहेत, तर गुरूवारी पुण्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे मध्यरात्रीपासून उजनीतून आणखी विसर्ग वाढविण्यात येणार आहे. त्यामुळे हा टँकर काढायचा कसा? हा प्रश्न प्रशासनामसोर आहे.
हेही वाचा - राष्ट्रवादी काँग्रेसचे मूक आंदोलन ; शरद पवारांवर दाखल केलेल्या गुन्ह्याचा निषेध