ETV Bharat / state

मी अमेठी आणि रायबरेलीतही लक्ष घालू शकतो : आंबेडकरांचा काँग्रेसला इशारा - गांधी

अकोला लोकसभेच्या जागेसाठी हिदायत पटेलला उमेदवारी देण्यासाठी आपला विरोध होता. मात्र, काँग्रेसने हिदायत यांना उमेदवारी देऊन मला आव्हान दिले आहे.

पत्रकार परिषदेत बोलताना प्रकाश आंबेडकर
author img

By

Published : Mar 25, 2019, 10:01 PM IST

सोलापूर - अकोला लोकसभेच्या जागेसाठी हिदायत पटेलला उमेदवारी देण्यासाठी आपला विरोध होता. मात्र, काँग्रेसने हिदायत यांना उमेदवारी देऊन मला आव्हान दिले आहे. त्यामुळे मी अकोल्याची जागा लढवणारच आहे. तसेच मी अमेठी आणि रायबरेलीतही लक्ष घालू शकतो, असा इशारा अॅड. प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसला दिला आहे. ते आज सोलापूरमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.

पत्रकार परिषदेत बोलताना प्रकाश आंबेडकर

आज सोलापूरात प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या विरोधात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यंदा आंबेडकर अकोला आणि सोलापूर या दोन मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. सोलापूरातून त्यांच्यासमोर काँग्रेसकडून सुशिलकुमार शिंदे तर भाजपकडून डॉ. जयसिध्देश्वर शिवाचार्य यांचे आव्हान असणार आहे.

Intro:सोलापूर : अकोल्यात काँग्रेसनं हिदायातला उमेदवारी दिली हरकत नाही.या निवडणुकीत कदाचित मी उभा राहिलो नसतो पण मुस्लिम उमेदवार देऊन काँग्रेसनं मला आव्हान दिलं म्हणून मी उभा आहे. मग मी आता काँग्रेसच्या विरोधात रायबरेली आणि अमेठीतही लक्ष घालू शकतो असा सुचक इशारा प्रकाश आंबेडकर यांनी सोलापूरात काँग्रेसला दिलाय...

Body:प्रकाश आंबेडकरांनी आज सोलापूरात काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या विरोधात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत आंबेडकर बोलत होते. त्यावेळी त्यांना अकोला मतदारसंघात हिदायत शेख यांच्या उमेदवारीला आपला आक्षेप होता काय असा सवाल केला असता त्यांनी काँग्रेसला हे आव्हान दिलंय.

Conclusion:वंचित बहुजन आघाडीकडून मतविभाजनाच्या भीतीपोटी काँग्रेसची राजकीय कोंडी करण्यात येत आहे.त्यासाठी काँग्रेसनं हिदायातच्या उमेदवारीमुळं दोन्ही ठिकाणी आंबेडकरानांही रोखण्याचा प्रयत्न होतोय.अंतिम चित्रं काय असेल हे आतातरी सांगणं कठीण आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.