सोलापूर - भारताचा ७३ वा स्वातंत्र्य दिन सोलापूर महानगरपालिकेच्या आवारात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सोलापूर शहराच्या प्रथम नागरिक महापौर शोभा बनशेट्टी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर महानगरपालिकेच्या गुणवंत अधिकारी आणि कामगारांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
सुरुवातीला महापौर शोभा बनशेट्टी यांनी आप्पासाहेब वारद यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन केले. त्यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले. स्वतंत्र भारताच्या जयजयकाराच्या घोषणा करण्यात आल्या.
यावेळी मनपा अतिरिक्त आयुक्त श्रीकांत मायकलवार, उपयुक्त त्र्यंबक ढेगळे पाटील, गटनेते आनंद चंदनशिवे यांच्यासह मनपा सर्व खातेप्रमुख आणि कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते.