पंढरपूर - माढा तालुक्यातील एका विवाहित महिलाने घराच्या वाश्याला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. वर्षा चंद्रकांत ओहोळ अशा या विवाहित महिलेचे नाव आहे. या महिलेच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याबाबत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा - ३०० फूट दरीत कोसळला वऱ्हाडाचा ट्रक; तीन ठार, 64 जखमी
निमगाव सीना येथे राहणाऱ्या वर्षा यांचा विवाह चंद्रकांत ओहोळ यांच्याशी वर्षांपूर्वी झाला होता. बुधवारी सायंकाळी सातच्या सुमारास वर्षा यांनी घरी कोणी नसताना ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. वर्षा यांच्या घराशेजारीच राहणाऱ्या दगडू ओहोळ यांना ही घटना समजली. त्यानंतर दगडू ओहोळ यांनी माढा पोलिसात ही बातमी दिली. पोलीस पुढील तपास करत आहेत.