ETV Bharat / state

एक मराठा ! लाख मराठा ! अशा घोषणा देत राष्ट्रीय महामार्गवर टायर जाळून आंदोलन - सोलापूर मराठा क्रांती मोर्चा न्यूज

दुपारी गनिमी कावा पद्धतीने सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावर मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलकांनी टायर जाळून रास्ता रोको आंदोलन केले. सर्वोच्च न्यायालयाने सन 2020 व 2021 या वर्षासाठी मराठा आरक्षणाला स्थगिती दिली आहे. या स्थगितीमुळे शिक्षण क्षेत्रात व नोकरी भरती वेळी मराठा समाजातील तरुणांना आरक्षणाचा लाभ घेता येणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निर्णयात घोषित केले आहे. या निकालामुळे राज्यभर मराठा समाजात तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

राष्ट्रीय महामार्गवर टायर जाळून आंदोलन
राष्ट्रीय महामार्गवर टायर जाळून आंदोलन
author img

By

Published : Sep 11, 2020, 7:16 PM IST

सोलापूर - राष्ट्रीय महामार्गावर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने टायर जाळून राष्ट्रीय महामार्ग रोखून धरला होता. मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा पेटला असून सोलापुरात ठिकठिकाणी यासाठी आंदोलने पेटली आहेत. गनिमी काव्याने राज्यभर आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलकांनी दिली.

राष्ट्रीय महामार्गवर टायर जाळून आंदोलन

शुक्रवारी सकाळी अवंती नगर येथील पाण्याच्या टाकीवरून उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी केला होता. फौजदार चावडी पोलिसांनी वेळीच घटनास्थळी धाव घेऊन सर्व मराठा क्रांती मोर्चाच्या सदस्यांना ताब्यात घेतले.

दुपारी गनिमी कावा पद्धतीने सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावर मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलकांनी टायर जाळून रास्ता रोको आंदोलन केले. सर्वोच्च न्यायालयाने सन 2020 व 2021 या वर्षासाठी मराठा आरक्षणाला स्थगिती दिली आहे. या स्थगितीमुळे शिक्षण क्षेत्रात व नोकरी भरती वेळी मराठा समाजातील तरुणांना आरक्षणाचा लाभ घेता येणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निर्णयात घोषित केले आहे. या निकाला मुळे राज्यभर मराठा समाजात तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याचे पडसाद सोलापुरात सकाळपासून उमटत आहे. सकाळी अवंती नगर येथे पाण्याच्या टाकीवरून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तर, दुपारी सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावर टायर जाळून रास्ता रोको आंदोलन झाले.

यावेळी पुणे महामार्गावर एक मराठा लाख मराठा अशा घोषणा मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांकडून देण्यात आल्या. जवळपास अर्धा तास महामार्गावरील वाहतूक व्यवस्था ठप्प झाली होती. यावेळी किरण पवार, अजिंक्य पाटील, निखिल थोरात, राहुल दहीहंडे, सौदागर, क्षीरसागर, राम जाधव आदी उपस्थित होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.