सोलापूर - शेतात चालणाऱ्या जुगार अड्ड्यावर कारवाई करत ग्रामीण पोलिसांनी सुमारे साडेपंधरा लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई गुरुवारी (दि. 19 ऑगस्ट) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास वांगी (ता. दक्षिण सोलापूर) शिवारात शेगावकर यांच्या शेतात करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, वांगी शिवारातील शेगावकर यांच्या शेतातील लिंबाच्या झाडाखाली मन्ना नावा जुगार सुरू असल्याची माहिती ग्रामीण पोलिसांना मिळाी होती. त्यानुसार सहायक पोलीस निरीक्षक नितीन थिटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पिंगुवाले यांच्या पथकाने छापा टाकला. त्यावेळी शहरात वास्तव्यास असलेल्या चार संशयित जुगाऱ्यांना अटक करण्याचे आले तर दोघांनी घटनास्थळावरुन पळ काढला. त्यांच्याकडून 15 लाख 65 हजार 250 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
हे आहेत आरोपी
तिरुपती बाबुराव भरले (वय 35 वर्षे, रा. मजरेवाडी, सोलापूर), चंद्रशेखर नामदेव वटारे( वय 46 वर्षे, रा. गजानन नगर, सोलापूर), कमलेश्वर बाबुराव निळ (वय 47 वर्षे, रा. राघवेंद्र नगर सोलापूर), जावेद आल्लाबक्ष देवणी (वय 48 वर्षे, रा. मुलतानी बेकरीसमोर, सोलापूर) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
15 लाख 65 हजारांचा मुद्देमाल जप्त
मंद्रुप पोलिसांनी घटनास्थळवरून जुगार साहित्य, रोख रक्कम, चारचाकी व दुचाकी वाहने, असा एकूण 15 लाख 65 हजार 250 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत मंद्रुप पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा - सोलापूर : बांधकाम व्यवसायिकासह मजुराला गावठी पिस्तूल अन काडतुसासह अटक