ETV Bharat / state

चारित्र्याचा संशयावरुन कुऱ्हाडीचे घाव घालत पत्नीची हत्या - सोलापूर खून बातमी

सोलापुरातील कुमठे येथे एका 55 वर्षीय पुरुषाने आपल्या पत्नीच्या चारित्र्याच्या संशयावरुन कुऱ्हाडीचा घाव घालत खून केला आहे.

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Nov 30, 2020, 4:57 AM IST

Updated : Dec 1, 2020, 7:26 PM IST

सोलापूर - कुमठे येथील एका पन्नास वर्षीय महिलेचा खून झाला आहे. चारित्र्यावर संशय घेत पतीने पत्नीच्या मानेवर कुऱ्हाडीचा घाव घालून खून केला आहे. शमशाद महिबूब शेख (वय 50 वर्षे, रा. कुमठे, ता. उत्तर सोलापूर), असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे.संशयित आरोपी पती महिबूब हबीब शेख (वय 55 वर्षे, रा. कुमठे, उत्तर सोलापूर) या विरोधात विजापूर नाका पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.पत्नीची मानच तोडल्याने परिसरात हळहळ व्यक्त केले जात आहे.

मानेवर आणि कानावर जबर घाव

महिबूब शेख हा गेल्या तीन महिन्यांपासून पत्नी शमशादच्या चारित्र्यावर संशय घेत होता. यामुळे दोघा पती-पत्नीमध्ये भांडणे होत होती. पण, रविवारी (दि. 29 नोव्हेंबर) सकाळी संशयावरून दोघांमध्ये वाद विकोपास गेला. घरातील कुऱ्हाड घेऊन महिबूबने शमशादच्या मानेवर, नाकावर व कानावर जोराने घाव घातला. या दोन घावातच शमशाद याची मान मोडली.

मुलाने दिली तक्रार

मागील तीन महिन्यांपासून आरोपी महिबूब हबीब शेख हा घरात दोन्ही मुलांवर चिडून होता. पत्नीवर संशय घेत कुटुंबातील सर्व सदस्यांसोबत सतत वाद घालता होता. शेवटी रविवारी सकाळी खून करूनच महिबूब शेख हा शांत झाला. मुलगा जीलानी यानेच वडिलांविरोधात विजापूर नाका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

शमशाद रक्ताच्या थारोळ्यात

मोठा मुलगा गौस शेख हा कामावर गेला. धाकटा मुलगा जीलानी हा घरीच होता. आई-वडिलांचे भांडणे पाहून त्याने गांभीर्यपणा घेतला नाही. तो विहिरीवर पाणी भरण्यासाठी गेला असता काही वेळातच आई शमशादचा किंचाळण्याचा आवाज आला. जीलानी हा धावत घरी आला तर आई रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. वडील बाजूला हातामध्ये कुऱ्हाड घेऊन थांबले होते. जीलानीने आईला शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. पण, डॉक्टरांनी शमशाद याला मृत घोषित केले.

कुमठे गावात एकाच महिन्यात दुसरा खून

कुमठे हे गाव आता सोलापूर शहर महानगरपालिका हद्दीत येत आहे .एकाच महिन्यात दुसरा खून या गावात झाला आहे. यापूर्वी लक्ष्मीबाई माने हिचा मर्डर झाला होता. अनैतिक संबंधातून मुलीनेच आईचा काटा काढला होता. आता चारित्र्याचा संशय घेत पतीने कुऱ्हाडीने मारुन पत्नीला संपविले आहे.

हेही वाचा - सोलापूर शहरात चोऱ्यांचे सत्र सुरूच, घर फोडून पावणेचार लाखांचा ऐवज लंपास

हेही वाचा - पदवीधर-शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज, १ तारखेला मतदान

Last Updated : Dec 1, 2020, 7:26 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.