ETV Bharat / state

प्रेयसीच्या मानसिक त्रासाला कंटाळून प्रियकराची आत्महत्या - सोलापूर आत्महत्या प्रकरण

प्रेयसीच्या नेहमीच्या त्रासाला कंटाळून त्याने गाव सोडले. तरी देखील त्याचा मानसिक त्रास मागे होताच. पैसे नाही दिलेस तर बलात्काराच्या केसमध्ये अडकवेन, अशी धमकी प्रेयसी देत होती. सचिनने या धमकीस घाबरून झोपेच्या गोळ्या खाऊन यापूर्वीही आत्महत्येचा प्रयत्न केला होतचा. त्यानतंर 12 जुलै रोजी जागरणाच्या कामाला जातो, असे सांगून तो घरातून गेला होता.

Lover harassment and suicide
सचिन पडळकर
author img

By

Published : Jul 15, 2020, 9:35 AM IST

सोलापूर - माळशिरस तालुक्यातील नातेपुते येथील एका तरुणाने विवाहित प्रेयसीच्या मानसिक त्रासाला कंटाळून कॅनॉलमध्ये उडी मारून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. सचिन मधुकर पडळकर( वय 38) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. सचिनने प्रेयसीच्या त्रासाला कंटाळून अहमदनगर शहर सोडले होते, तरीही बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची तिच्याकडून धमकी दिली जात होती. अखेर प्रेयसीच्या नेहमीच्या मानसिक त्रासाला कंटाळून प्रियकराने आपली जीवन यात्राच संपविली आहे.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, सचिन पडळकर हा अहमदनगर येथे नोकरीस होता. तिथे तो आपल्या कुटुंबीयांसोबत राहत होता. सचिनचे वडील अहमदनगर येथील एका कंपनीमध्ये नोकरीस होते. त्यांच्या मुत्यूनंतर वडिलांच्या जागी सचिन यास नोकरी लागली होती. नोकरीच्या ठिकाणी सचिनची एका विवाहित तरुणीबरोबर ओळख झाली होती. ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. काही महिन्यानंतर त्या विवाहित तरुणीने व तिच्या भावाने सचिनकडे पैशाचा तगादा लावला होता. यावर सचिनने त्यांना अडीच लाख रुपये दिले. मात्र त्यांच्याकडून सचिनला मानसिक त्रास सुरूच होता. त्यांच्या त्रासाला कंटाळून सचिन अहमदनगर शहर व नोकरी सोडून मूळ गावी नातेपुते (माळशिरस) येथे राहावयास आला होता.

नातेपुते गावात त्याने कपड्यांचा व्यवसाय थाटला होता. प्रेयसीच्या नेहमीच्या त्रासाला कंटाळून त्याने गाव सोडले. तरी देखील त्याचा मानसिक त्रास मागे होताच. पैसे नाही दिलेस तर बलात्काराच्या केसमध्ये अडकवेन, अशी धमकी प्रेयसी देत होती. सचिनने या धमकीस घाबरून झोपेच्या गोळ्या खाऊन यापूर्वीही आत्महत्येचा प्रयत्न केला होतचा. त्यानतंर 12 जुलै रोजी जागरणाच्या कामाला जातो, असे सांगून तो घरातून गेला होता. मात्र तो परत न आल्याने घरच्या लोकांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला होता. पण त्याचा काहीच पत्ता न लागल्याने सचिनच्या आईने माळशिरस पोलीस ठाण्यात मिसिंगची नोंद केली होती.

सचिन पडळकर यांच्या शेजारी राहणाऱ्या संतोष भरते यांनी सांगितले की, चांदापुरी कॅनॉलमध्ये एक मृतदेह आढळला आहे. सचिनच्या आईने त्या कॅनॉलकडे धाव घेतली. त्यावेळी तो मृतदेह सचिनचाच असल्याची खात्री झाल्याने आईने घटनास्थळी हंबरडा फोडला. सचिन पडळकर याच्या मृतदेहाजवळ मोबाईल व काही चिठ्ठ्या आढळल्या आहेत. त्यामध्ये प्रेयसीच्या सततच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केले असल्याचे नमूद केले आहे. याबाबत पोलीस तपास सुरू असून प्रेयसी व तिच्या भावाला लवकरच चौकशीसाठी ताब्यात घेण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.