सोलापूर - माळशिरस तालुक्यातील मळोली येथे वेळापूर पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्याच्या अंगावर पेट्रोल टाकून जीवे मारण्याचा प्रयत्न केला असल्याची तक्रार पोलिसांनी दिली आहे. जावेद नजीर जमादार, असे त्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. मळोली गावातील अरुणसिंह फत्तेसिंह जाधव यांनी मारहाण केल्याची तक्रार वेळापूर पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस कर्मचारी जावेद नजीर जमादार हे मळोली या गावात गेले होते. गावात पेट्रोलिंग करत असताना मळोली गावातील रहिवाशी अरूणसिंह फत्तेसिंह जाधव यांनी माझ्या हॉटेलमध्ये कशाचा चौकशी करायला आला होता, असे म्हणत मारहणा केली आणि अंगावर पेट्रोल टाकून जीवे मारण्याचा प्रयत्न केला असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
पोलीस कर्मचारी पेट्रोलिंग करत असताना पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी वेळापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.
हेही वाचा - सोलापूर : टाळेबंदीमुळे वैदू समाजावर उपासमारीची वेळ