ETV Bharat / state

निवडणूक आयोगाने मतदानादिवशी बोटावर शाई लावण्याऐवजी चुना लावावा, महिबूब शेख यांची टीका

Mahiboob Shaikh Criticized BJP: भाजपा विरोधात निवडणुकीत उभं राहून जिंकून येणारा उमेदवार हा निवडून आल्यानंतर भाजपासोबत जात सत्तेत सहभागी होत आहे. (Election Commission) एक प्रकारे जनतेला चुना लावण्याचं काम राज्यात सुरू आहे. (NCP leader Mahiboob Sheikh) निवडणूक आयोगानं आगामी निवडणुकीत मतदानाच्या दिवशी जनतेच्या बोटांवर शाई लावण्याऐवजी चुना लावावा, असा मार्मिक सल्ला राष्ट्रवादीचे युवक प्रदेशाध्यक्ष महिबूब शेख यांनी सोलापूरमध्ये दिला आहे.

Mahiboob Shaikh Criticized BJP
महिबूब शेख यांची टीका
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 20, 2023, 8:27 PM IST

महिबूब शेख भाजपा आणि अजित पवार गटावर टीका करताना

सोलापूर Mahiboob Shaikh Criticized BJP : राष्ट्रवादीचे प्रदेश युवक प्रदेशाध्यक्ष महिबूब शेख यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी दुपारी युवक मेळावा आयोजित करण्यात आला होता. बैठकीत आणि मेळाव्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सर्व स्थानिक नेते उपस्थित होते. महिबूब शेख यांनी भाषण करताना राष्ट्रवादीच्या अजित पवार गटावर देखील सडकून टीका केली. भारतीय संसदेत हुकूमशाही चालली आहे हे 141 खासदारांच्या निलंबनावरून लक्षात येत आहे, असं ते म्हणाले. (Mahiboob Sheikh criticizes Ajit Pawar group)

अशा नेत्याचा हिटलर सारखा मृत्यू होणार : भारतीय संसदेत 141 खासदारांना निलंबित करण्यात आलं आहे. संसदेत बाहेरचे लोक येऊन गोंधळ करतात. संसदेमधील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याबाबत चर्चा करावी अशी मागणी खासदारांनी केली होती. सुरक्षेच्या प्रश्नावरून लोकसभेत गोंधळ झाला होता. लोकसभा अध्यक्षांनी 141 खासदारांना निलंबित केलं आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे या सातवेळा संसद रत्न पुरस्कार प्राप्त आहेत. दोनवेळा महासंसद रत्न पुरस्कार मिळाला आहे. त्यांना देखील निलंबित केलं जातं ही लोकशाहीत शोकांतिका आहे. देशात एक प्रकारची हुकूमशाही निर्माण झाली आहे. हिटलरची चाल चालणाऱ्या नेत्याचा मृत्यू देखील हिटलर सारखा होणार, अशी अप्रत्यक्ष टीका महिबूब शेख यांनी केली आहे.

आता एवढंच म्हणायचं बाकी राहिलं : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खरमरीत समाचार घेत महिबूब शेख यांनी शरद पवारांचा इतिहास सांगण्याचा प्रयत्न केला. 1995 साला पासून शरद पवार हे राज्याच्या राजकारणात नाहीत. तर मराठा आरक्षणाबाबत ते कशी काय आडकाठी घालतील? देवेंद्र फडणवीस यांनीच मराठा विरोधात ओबीसी संघर्ष पेटवला आहे. भविष्यात देवेंद्र फडणवीस हे हिंदू-मुस्लिम संघर्ष पेटवतील, अशी टीका महिबूब शेख यांनी केली. काय जरी झालं तर देवेंद्र फडणवीस हे शरद पवारांवर टीका करतात. आता भूकंप किंवा अवकाळी पाऊस जरी आला तर शरद पवारांमुळे आला, असं म्हणायचं बाकी राहिलं असंही ते म्हणाले.

हेही वाचा:

  1. 'मॉब लिंचिंगसाठी फाशीची शिक्षा, देशाविरुद्ध बोलल्यास जेलची हवा', लोकसभेत फौजदारी कायदा सुधारणा विधेयकं मंजूर
  2. ''चाहिए पैसा, निकलो मोर्चा'', मुख्यमंत्र्यांची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका
  3. लालू पिता-पुत्रांच्या अडचणी वाढल्या, ईडीकडून समन्स; 'या' घोटाळ्याप्रकरणी चौकशीसाठी बोलावलं

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.