ETV Bharat / state

Maharashtra Local Body Elections 2021 : माळशिरसमध्ये मोहिते-पाटलांची प्रतिष्ठ पणाला, श्रीपूरमध्ये भाजप-राष्ट्रवादीत सामना

राज्यामध्ये नगरपंचायत व नगरपालिकेच्या निवडणुकीचे (Maharashtra Local Body Elections 2021) वारे वाहत आहेत. माळशिरस तालुक्यातील माळशिरस नगरपरिषद निवडणूक शेवटच्या टप्प्यात आली आहे तर नव्याने स्थापन झालेल्या नातेपुते व श्रीपूर, बोरगाव या नगरपंचायतीसाठी 21 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे.माळशिरस तालुक्यातील तिन्ही नगर परिषद व नगर पंचायत निवडणुकीत विजयसिंह मोहिते पाटील यांच्या गटाची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

Malshiras and Sreepur Nagar Panchayat election

author img

By

Published : Dec 20, 2021, 10:26 PM IST

पंढरपूर (सोलापूर) - राज्यामध्ये (Maharashtra Local Body Elections 2021)नगरपंचायत व नगरपालिकेच्या निवडणुकीचे वारे वाहत आहेत. माळशिरस तालुक्यातील माळशिरस नगरपरिषद निवडणूक शेवटच्या टप्प्यात आली आहे तर नव्याने स्थापन झालेल्या नातेपुते व श्रीपूर, बोरगाव या नगरपंचायतीसाठी 21 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. या नगरपंचायत निवडणुकीत माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील व माढा मतदार संघाचे आमदार बबन दादा शिंदे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

माळशिरस तालुक्यात मोहिते-पाटील गटाची प्रतिष्ठा -

माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या गटाची प्रतिष्ठा माळशिरस तालुक्यातील तिन्ही नगर परिषद व नगर पंचायत निवडणुकीत पणाला लागली आहे. माळशिरस तालुका हा मोहिते-पाटील गटाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. माळशिरस तालुक्यातील नातेपुते व श्रीपुर या नगरपंचायत या नव्याने स्थापन करण्यात आलेल्या आहेत. यामध्ये अकलूज ग्रामपंचायतचे नगर परिषदेमध्ये रूपांतर करण्यात आले आहे.

श्रीपूर नगर पंचायतीमध्ये स्थानिक आघाड्यांना प्राधान्य..

श्रीपूर महाळुंग बोरगाव या तीन ग्रामपंचायती मिळून नगर पंचायतमध्ये रुपांतरित करण्यात आल्या आहेत. यामध्ये भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेच्या वतीने उमेदवार देण्यात आले आहेत. तर अपक्ष उमेदवारांनी स्थानिक स्वरूपाच्या आघाड्या तयार करून प्रस्थापित पक्षांना आव्हान दिले आहे. त्यामुळे या नगरपंचायत निवडणुकीमध्ये चुरस निर्माण झाली आहे. श्रीपूर नगरपंचायतमध्ये निवडून येणाऱ्या पहिल्या नगरसेवक व नगराध्यक्षासाठी उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. श्रीपूर नगरपंचायत च्या 17 पैकी 13 जागांवर निवडणूक लावण्यात आल्या आहेत तर चार जागा ओबीसी प्रवर्गासाठी राखीव ठेवून निवडणुकीला स्थगिती देण्यात आली आहे. 13 जागांसाठी सुमारे 83 उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत.

श्रीपूरमध्ये भाजप-राष्ट्रवादीत सामना
भाजपविरोधात राष्ट्रवादी-काँग्रेसचे तगडे आव्हान -

श्रीपुर महाळुंग व बोरगाव नगरपंचायत निवडणुकीमध्ये 13 जागांसाठी भारतीय जनता पार्टीसमोर राष्ट्रवादी काँग्रेसने तगडे आव्हान निर्माण केले आहे भारतीय जनता पार्टीचे नेते धैर्यशील मोहिते-पाटील यांनी निवडणुकीमध्ये रंगत आणली आहे. तर त्यात आमदार राम सातपुते यांनीही रंग भरला आहे. ते शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांना प्रचाराच्या मैदानात उतरवण्यात आले. त्यांच्या बरोबरीने आमदार बबनदादा शिंदे यांनीही ताकद पणाला लावली आहे. यामुळे या निवडणुकीकडे साऱ्यांचेच लक्ष लागून राहिले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.