ETV Bharat / state

निसर्गाचं अद्भूत वरदान लाभलेलं माढा तालुक्यातील महादेव मंदिर, वाचा...

माढा तालुक्यातील चिंचगावचे महादेव मंदिर हे ठिकाण, सदैव हिरवाईने नटलेला हा परिसर अनेक वर्षांपासून पर्यटन स्थळ म्हणून नावारुपास आला आहे.

solapur Mahadev temple
solapur Mahadev temple
author img

By

Published : Sep 27, 2021, 8:46 AM IST

माढा (सोलापूर) - कुर्डूवाडी-बार्शी मार्गावर कुर्डूवाडीपासून अवघ्या काही अंतरावर असलेले तसेच 'ब' तिर्थ क्षेत्राचा दर्जा मिळालेले माढा तालुक्यातील चिंचगावचे महादेव मंदिर हे ठिकाण, सदैव हिरवाईने नटलेला हा परिसर अनेक वर्षांपासून पर्यटन स्थळ म्हणून नावारुपास आला आहे. या मंदिराचा जिर्णोद्धार रामानंद सरस्वती महाराज यांनी केला होता. त्यांच्या निधनानंतर उत्तराधिकारी म्हणून शिवचरणानंद सरस्वती महाराज सद्या काम पाहत आहेत.

मंदिराची बांधणी दाक्षिणात्य पद्धतीची -

मंदिराची बांधणी दाक्षिणात्य पद्धतीची असून श्रावण महिन्यात येथे लाखो भाविक दर्शनासाठी येतात. 5 मे 2005 रोजी विविध राज्यातील वेदशास्त्रसंपन्न विभुतीना आमंत्रित करुन या मंदिरावर अकरा कलश आरोहणाचा उत्सव आयोजित करण्यात आला होता. चहूबाजूंनी हिरवी गर्द वनराई आणि परिसरातील निसर्गरम्य वातावरणामुळे अनेक जण येथे सहलीला देखील येतात. 1964 सालच्या भूकंपामुळे मंदिरास तडे गेले होते. त्यानंतर लोकवर्गणीतून दिवंगत रामानंद सरस्वती महाराज यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला.

हेही वाचा- World Tourism Day : कास पठारावर आच्छादला रंगीबेरंगी फुलांचा गालिचा ! जैवविविधतेचे हॉटस्पॉट, पाहा PHOTO

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.