ETV Bharat / state

घरच्यांच्या भीतीपोटी अल्पवयीन प्रेमी युगुलाची आत्महत्या; मोहोळमधील घटना - मोहोळ आत्महत्या बातमी

नरखेड येथील 19 वर्षीय मुलगा व 14 वर्षीय मुलगी या दोघांचे प्रेम प्रकरण होते. या प्रेमप्रकरणाची माहिती घरच्यांना मिळाली तर आपल्याला प्रखर विरोध होईल, यामुळे या दोघांनी आत्महत्या केली आहे.

suicide
अल्पवयीन प्रेमी युगुलाची आत्महत्या
author img

By

Published : Sep 17, 2020, 7:32 PM IST

सोलापूर - शालेय शिक्षण घेत असलेल्या प्रेमी युगुलाने लिंबाच्या झाडाला गळफास घेत आत्महत्या केली आहे. आपल्या प्रेम प्रकरणाची माहिती घरच्यांना समजली तर मोठा विरोध होईल, या भीतीपोटी एका प्रेमी युगुलाने आत्महत्या केली. मोहोळ तालुक्यातील नरखेड येथील एका शेतकऱ्याच्या शेतातील लिंबाच्या झाडाला त्यांनी गळफास घेतला. १७ सप्टेंबरच्या पहाटे मुलीने दोरीने तर मुलाने तिच्या ओढणीच्या मदतीने दोघांनी एकाच वेळेस एकाच झाडावर वेगवेगळ्या फांदीला गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली.

अल्पवयीन प्रेमी युगुलाची आत्महत्या

हेही वाचा -मुंबईच्या महापौरांची चौकशी करा, किरीट सोमैयांची पालिका आयुक्तांकडे मागणी

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नरखेड येथील 19 वर्षीय मुलगा व 14 वर्षीय मुलगी या दोघांचे प्रेम प्रकरण होते. या प्रेमप्रकरणाची माहिती घरच्यांना मिळाली तर आपल्याला प्रखर विरोध होईल, या भीतीने १७ सप्टेंबरला रात्री हे दोघेही घरातून निघून गेले होते. बुधवारी रात्री या दोघांच्या घरच्यांनी शोध घेतला असता, दोघांचा ठावठिकाणा लागला नव्हता. या प्रेमी युगुलाने गुरुवारी पहाटे तीनच्या सुमारास नरखेड येथील एका शेतातील बांधावरील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

सदर घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक संतोष इंगळे व सहाय्यक पोलीस निरीक्षक अशुतोष चव्हाण यांनी घटनास्थळाला भेट देऊन पंचनामा केला. यानंतर दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी मोहोळ येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये पाठवले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.