ETV Bharat / state

सोलापुरात रेशन दुकानावर नागरिकांच्या लांबच लांब रांगा

सोलापुरात 8 मे पासून 15 मे पर्यंत कडक लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. मात्र, रेशन दुकानं सुरू ठेवण्यास परवानगी आहे. त्यामुळे आज रविवारनिमित्त जुनी पोलीस लाईन येथे बिराजदार रेशन धान्य दुकानासमोर नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे दिसले.

सोलापूर
सोलापूर
author img

By

Published : May 9, 2021, 3:53 PM IST

सोलापूर - सोलापूर शहरात आणि जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. वाढती रुग्णसंख्या कमी करण्यासाठी सोलापुरात 5 एप्रिलपासून लॉकडाऊन लागू केला आहे. तसेच 8 मे पासून 15 मे पर्यंत कडक लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. स्थानिक प्रशासनाने सोलापुरात सर्व व्यवहार 7 दिवसांसाठी बंद केले आहेत. पण रेशन दुकाने सुरू ठेवण्यासाठी कडक लॉकडाऊनमध्येही परवानगी दिली आहे. सकाळी 6 ते 11 वाजेपर्यंत रेशन दुकान उघडण्यास परवानगी आहे. मात्र आज (9 मे) सकाळपासून जुनी पोलीस लाईन येथे बिराजदार रेशन धान्य दुकानासमोर लांबच लांब रांगा लागल्याचे दिसले.

सोलापुरात रेशन दुकानावर नागरिकांच्या लांबच लांब रांगा

नागरिकांना धान्य मिळणार मोफत

सोलापूर शहरातील सुमारे 5 लाख 20 हजार नागरिकांना धान्य मोफत वितरण केले जाणार आहे. अंत्योदय अन्न योजना (पिवळे रेशन कार्डधारक) आणि प्राधान्य कुटुंब लाभार्थी (केशरी कार्डधारक) यांना प्रती सदस्य 3 किलो गहू आणि 2 किलो तांदूळ मोफत देण्यात येत आहे. मे आणि जून दोन्ही महिन्यात अंत्योदय अन्न योजनेच्या 25 हजार लाभार्थ्यांना 1500 क्विंटल गहू आणि 1 हजार क्विंटल तांदूळ दिला जाईल. तर प्राधान्य कुटुंब योजनेतील 4 लाख 95 हजार लाभार्थ्यांना 29 हजार 700 क्विंटल गहू आणि 19 हजार 800 क्विंटल तांदूळ वितरित केला जाणार आहे. शहरात सुमारे 314 स्वस्त धान्य दुकाने आहेत. या दुकानात धान्य वितरित करण्यात येत आहे.

हेही वाचा - परमबीर सिंग यांच्या अडचणीत वाढ, तीन प्रकरणांमध्ये एसीबीकडून गोपनीय चौकशी

हेही वाचा - कलर कोड कुपन सिस्टमनुसार होणार ठाणेकरांचे लसीकरण

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.