ETV Bharat / state

Lockdown Relaxation - सोलापुरात लॉकडाऊन शिथिल झाल्याने आर्थिक चक्र पुन्हा सुरू - सोलापूर लॉकडाऊन शिथिलता

शनिवारी आणि रविवार फक्त अत्यावश्यक सेवांना परवानगी दिली आहे. राज्यातील बहुतांश शहरात लॉकडाऊनच्या नियमावलीत शिथिलता देण्यात आली होती. मात्र लोकसंख्येच्या जुन्या निकषामुळे सोलापुरातील लॉकडाऊन 15 जूनपर्यंत लागू करण्यात आले होते. त्यामुळे तीन दिवस उशीरा सोलापुरातील बाजारपेठ खुली झाली आहे.

लॉकडाऊन शिथिल
लॉकडाऊन शिथिल
author img

By

Published : Jun 4, 2021, 5:42 PM IST

Updated : Jun 4, 2021, 7:30 PM IST

सोलापूर - सोलापूर शहरातील बहुतेक बाजार पेठातील सर्वच प्रकारची दुकाने शुक्रवारपासून सुरू झाली आहेत. पालिका प्रशासनाने कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनचे नियम लावून केवळ अत्यावश्यक सेवेतील दुकाने उघडी ठेवण्यास परवानगी दिली होती. तब्बल दोन महिन्यानंतर शुक्रवारपासून दुकाने खुली ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे आज (शुक्रवारी) सकाळपासून सोलापुरातील बाजारपेठेत ग्राहकांची वर्दळ दिसून आली. काही दुकानधारकांनी दोन महिन्यानंतर साफ सफाईचे काम करताना दिसून आले, तर काही दुकानांत विविध वस्तूची विक्री सुरू होती. बाजारपेठेतील व्यपारी वर्गात आनंदाचे वातावरण पहायला मिळाले.

सोलापुरात पुन्हा अर्थचक्र सुरू
आठवड्यातून पाच दिवस सर्व प्रकारची दुकाने सुरू

सोलापूर महानगरपालिका प्रशासनाने सोमवार ते शुक्रवार असे म्हणत आठवड्यातून पाच दिवस शहरातील सर्व दुकाने उघडण्यास परवानगी दिली आहे. सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत या दुकानधारकांना वेळ देण्यात आली आहे. शनिवारी आणि रविवार फक्त अत्यावश्यक सेवांना परवानगी दिली आहे. राज्यातील बहुतांश शहरात लॉकडाऊनच्या नियमावलीत शिथिलता देण्यात आली होती. मात्र लोकसंख्येच्या जुन्या निकषामुळे सोलापुरातील लॉकडाऊन 15 जूनपर्यंत लागू करण्यात आले होते. त्यामुळे तीन दिवस उशीरा सोलापुरातील बाजारपेठ खुली झाली आहे.

दुपारी 3 नंतर मात्र सोलापुरात संचारबंदी सुरू

पालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी गुरुवारी रात्री उशीरा सुधारित आदेश पारित केला. आठवड्यातून पाच दिवस सर्व प्रकारच्या व्यवसायिकांना सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत व्यवसाय करण्यास परवानगी दिली आहे. मात्र दुपारी 3 नंतर शहरात संचारबंदी सुरू राहणार आहे. फक्त अत्यावश्यक सेवांना दुपारी 3 नंतर परवानगी दिली आहे. ई कॉमर्स क्षेत्रात काम करणाऱ्याना घरपोच सुविधा देण्यासाठी आणि ज्याकडे पोलीस व महानगरपालिकेची परवानगी असेल अशानांच 8 पर्यंत घरपोच सेवा देण्यासाठी परवानगी राहणार आहे.

गेल्या दोन महिन्यात 200 कोटींची उलाढाल ठप्प

सोलापूर शहरात नवी पेठ, माणिक चौक, विजापूर वेस, बेगम पेठ अशोक चौक याठिकाणी बाजारपेठ आहेत. या सर्व बाजारपेठमध्ये दररोज जवळपास एक कोटी रुपयांपर्यंत उलाढाल होते. दोन महिन्यापासून सोलापुरातील सर्व व्यवहार, व्यवसाय ठप्प झाले होते. या दोन महिन्यांत सोलापुरातील 200 कोटींची उलाढाल ठप्प झाली होती. आज (शुक्रवार)पासून पुन्हा सोलापुरातील आर्थिक चक्र सुरू झाले आहेत.

हेही वाचा-यंदा आषाढी वारी झालीच पाहिजे; भाजपा अध्यात्मिक आघाडीची मागणी

Last Updated : Jun 4, 2021, 7:30 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.