ETV Bharat / state

लॉकडाऊनमध्ये मुक्त संचार : उजनीच्या काठावर देशी-विदेशी पक्ष्यांची हजेरी

author img

By

Published : May 22, 2020, 5:19 PM IST

यंदाच्या वर्षी झालेल्या समाधानकारक पावसामुळे उजनी धरणामध्ये पक्ष्यांसाठी अत्यंत पुरक अशा प्रकारचे वातावरण होते. त्यातच लॉकडाऊनची भर पडली. यामुळे बदकांसह विविध करकोचे, रोहित फ्लेमिंगो, नदीसुरम्य, समुद्रपक्षी, तुतुवार, पाणटिळवा, भोरड्या, बगळे आदी परदेशी पक्षी मोठ्या संख्येने या परिसरात मुक्त संचार करताना पाहायला मिळत आहेत.

Lockdown Effect : many birds are coming in solapur ujani dam
लॉकडाऊन इफेक्ट : उजनीच्या काठावर देशी-विदेशी पक्ष्यांचा मुक्त संचार

सोलापूर - जिल्ह्यासाठी वरदायिनी असलेल्या उजनी धरणाच्या पाणवठ्यावर पक्ष्यांसाठी पोषक असे वातावरण आहे. यामुळे दरवर्षी युरोप, उत्तर अमेरिकासह अंटार्टिका प्रदेश, रशिया, मंगोलिया, कझाकिस्तान, सायबेरिया येथून हजारो मैल अंतर पार करून विविध जातीचे पक्षी उजनी धरण परिसरात गर्दी करतात. यंदाच्या वर्षी तर लॉकडाऊनमुळे मासळी बाजार बंद असल्याने मासेमारीही बंद आहे आणि पक्षी पर्यटनसुद्धा बंद आहे. यामुळे माणसांचा संपर्क नदीपात्रात अत्यंत कमी झाल्यामुळेच पक्षांना मोकळीक मिळाली आहे.

उजनी जलाशयात मुक्त संचार करणाऱ्या पक्षांबाबत माहिती देताना पक्षीप्रेमी....

उजनी धरण परिसर देशी विदेशी पक्ष्यासाठी नंदनवन समजलं जाते. या परिसरात अनेक परदेशी पक्षी येत असतात. देशी आणि स्थानिक स्थलांतरीत पक्षी मोठ्या संख्येने इथे हजेरी लावतात. यंदाच्या वर्षी झालेल्या समाधानकारक पावसामुळे उजनीमध्ये पक्ष्यांसाठी अत्यंत पुरक अशा प्रकारचे वातावरण होते. त्यातच लॉकडाऊनची भर पडली. यामुळे बदकांसह विविध करकोचे, रोहित फ्लेमिंगो, नदीसुरम्य, समुद्रपक्षी, तुतुवार, पाणटिळवा, भोरड्या, बगळे आदी परदेशी पक्षी मोठ्या संख्येने या परिसरात मुक्त संचार करताना पाहायला मिळत आहेत.

दरवर्षीच्या तुलनेत या वर्षी फ्लेमिंगो हा देखणा पक्षी हजारोच्या संख्येत थव्याने मुक्त संचार करताना दिसून येत आहे. करड्या, पांढर्‍या अशा विविध रंगाचे आणि आकारातील बगळे, चित्रबलाक, करड्या रंगाचा करकोचा, वकील, वंचक, शराटी, वारकरी बदक आदि प्रकारचे स्थानिक पक्षी उजनी धरणपात्रात मुक्तपणे बागडत आहेत. अन्य कोणतीही वर्दळ आणि भितीशिवाय पक्षांची मुक्तशाळा नदीकाठी भरत आहे. लॉकडाऊनमुळे यंदाच्या वर्षी पक्षांना चांगलीच मोकळीक मिळाली असल्याचे पक्षी अभ्यासकांचे मत आहे.

उजनी जलाशयाच्या परिसरात उपलब्ध होणारे खाद्य, जलाशयातील मासे, वनस्पतीचे बी, फळे, देठे, पाने व खोड, शैवाळ यावर अनेक पक्षी अवलंबून आहेत. सुमारे २५० हून अधिक प्रजातींपैकी बहुतांशी पक्षी वर्षभर उजनी जलाशयाच्या परिसरात आढळतात. हे स्थलांतरित करून आलेले हिवाळी पाहुणे पक्षी उष्णतेच्या ४० अंशांच्या पाण्याचा अनुभव घेऊन पावसाळ्याच्या प्रारंभी आपल्या मूळस्थानी मार्गस्थ होतात.

हेही वाचा - सोलापूर जिल्ह्यातील 20 हजारांपेक्षा जास्त परप्रांतीय त्यांच्या राज्यात रवाना

हेही वाचा - करमाळ्यात भटक्या प्राण्यासांठी करण्यात आली चाऱ्याची सोय

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.