ETV Bharat / state

Rahul Nagar : तब्बल १२ वर्षांनी हुतात्मा जवानाच्या नावे सुलतानपूरचे झाले राहुलनगर - Rahul Nagar

26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहिद झालेल्या जवानाच्या नावाने गावाचे नाव ठेवण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील सुलतानपूर ( Sultanpur village in Maharashtra ) हे गाव आता 'राहुल नगर' ( Rahul Nagar ) म्हणून ओळखले जाणार आहे. 26/11 मुंबई हल्ल्यादरम्यान दहशतवाद्यांशी लढताना कॉन्स्टेबल राहुल शिंदे शहीद ( Martyr Constable Rahul Shinde ) झाले होते.

Rahul Nagar
Rahul Nagar
author img

By

Published : Nov 26, 2022, 8:55 PM IST

Updated : Nov 28, 2022, 9:44 AM IST

सोलापूर - महाराष्ट्रातील सुलतानपूर ( Sultanpur village in Maharashtra ) हे गाव आता 'राहुल नगर' ( Rahul Nagar ) म्हणून ओळखले जाणार आहे. कारण स्थानिक रहिवाशांनी राहुल शिंदे यांच्या स्मरणार्थ गावाचे नाव बदलले ( Locals rename village ) आहे. 2008 मधील 26/11 मुंबई हल्ल्यादरम्यान दहशतवाद्यांशी लढताना कॉन्स्टेबल राहुल शिंदे शहीद ( Martyr Constable Rahul Shinde ) झाले होते.

Poster by Rahul Shinde
राहुल शिंदे यांचे पोस्टर

सुलतानपूर गावचे नाव राहुलनगर असे नामांतर - माढा तालुक्यातील सुलतानपूर गावचे नाव राहुलनगर असे नामांतर ( Sultanpur village was renamed as Rahulnagar ) झाले. 26/11च्या मुंबई हल्ल्यात सोलापूरचे एसआरपीएफ जवान राहुल शिंदे हे ताज हॉटेलमध्ये शाहिद झाले होते.आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांच्या सोबत एसआरपीएफची टीम ताज हॉटेलात घुसून त्यांनी आंतकवाद्यासोबत लढा दिला होता.

Martyred soldier Rahul Shinde
शहिद वीर जवान राहुल शिंदे

राहुल शिंदे यांना वीरगती - यामध्ये माढा तालुक्यातील सुलतानपूरचे राहुल शिंदे यांना वीरगती प्राप्त झाले होते. यानंतर सुलतानपूरचे राहुल नगर करावे अशी मागणी करण्यात आली होती. बारा वर्षानंतर सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने लेखी पत्राद्वारे सुलतानपूरचे राहुलनगर असे नाव करण्यात आले. पाच महिन्यांपूर्वी नामांतर झाले असल्याची माहिती शाहिद राहुल यांचे वडील सुभाष शिंदे यांनी दिली. आवश्यक त्या बदलाच्या नोंदी कार्यालयाच्या अधिपत्याखालील सर्व अभिलेखामध्ये घेण्यात आल्या आहेत. आवश्यक त्या गाव बदलाच्या नोंदी करुन अहवाल सादर करण्यात आले आहे.

Rahul Shinde village school
राहुल शिंदे यांच्या गावातील शाळा

बारा वर्षांनंतर सुलतानपूरचे झाले "राहुलनगर" - सुलतानपूर चे राहुलनगर नाव करण्याबाबत महाराष्ट्र शासनाकडून मंजुरी यापूर्वीच मिळाली होती. सोलापूर जिल्हा प्रशासनाकडे तो विषय रखडत गेला होता. तो आता मार्गी लागला आहे. पाच महिन्यांपूर्वी माढा तालुक्यातील सुलतानपूरचे राहुलनगर झाले आहे. याबाबत शहिद राहुल शिंदे यांचे वडील सुभाष शिंदे यांच्याशी संपर्क केला असता, त्यांनी माहिती दिली की,पाच महिन्यांपूर्वी राहुलनगर असे गावाचे नामांतर झाले आहे.

राहुल शिंदे
राहुल शिंदे

उंबरठे जिझवल्यानंतर नामांतर - २६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात वीरमरण पत्करलेल्या राहुल शिंदे यांचे स्मरण राहण्यासाठी गावचे नाव सुलतानपूर ऐवजी राहुलनगर करण्याची राहुलचे पिता सुभाष शिंदे यांचेसह ग्रामस्थांची मागणी होती. या मागणी साठी कुटूबिंयासह शहीद राहुल शिंदे संस्थेचे अध्यक्ष दतात्रय शिंदे यांनी प्रशासनाचे उंबरठे झिजवले होते. कित्येकदा मंत्रालयात हेलपाटे देखील मारले होते.

हिच खरी "श्रद्धांजली"सुभाष शिंदे - शहीद राहुल शिंदे यांचे वडील सुभाष शिंदे यांनी म्हटले की, अनेक वर्षे या मागणीसाठी आम्ही पाठपुरावा करीत राहिलो. अखेर आता कुठे यश आले आहे. शहीदाच्या प्रती शासनाने तत्परतेने काम करणे अपेक्षित आहे. गावचे नाव बदलाच्या हालचाली खालीपर्यंत पोहचल्या फार आनंद वाटला. गावचे नाव राहुलनगर होणे हीच माझ्या राहुलसाठी खरी श्रद्धांजली ठरली.

बारा वर्षांनंतर सुलतानपूरचे झाले "राहुलनगर" - सुलतानपूर चे राहुलनगर नाव करण्याबाबत महाराष्ट्र शासनाकडून मंजुरी यापूर्वीच मिळाली होती. सोलापूर जिल्हा प्रशासनाकडे तो विषय रखडत गेला होता. तो आता मार्गी लागला आहे.पाच महिन्यांपूर्वी माढा तालुक्यातील सुलतानपूरचे राहुलनगर झाले आहे.याबाबत शहिद राहुल शिंदे यांचे वडील सुभाष शिंदे यांच्याशी संपर्क केला असता, त्यांनी माहिती दिली की,पाच महिन्यांपूर्वी राहुलनगर असे गावाचे नामांतर झाले आहे.

गावातील समाज मंदीर
गावातील समाज मंदीर

दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात मृत्यू - 14 वर्षांपूर्वी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात राज्य राखीव पोलीस दलचे (SRPF) कॉन्स्टेबल राहुल शिंदे शहीद झाले होते. ते सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील सुलतानपूर येथील रहिवाशी होते. दहशतवाद्यांनी गोळीबार केल्याच्या वृत्तानंतर दक्षिण मुंबईतील ताजमहाल पॅलेस हॉटेलमध्ये प्रवेश करणाऱ्या पहिल्या पोलिस कर्मचाऱ्यांपैकी ते एक होते. शिंदे यांच्या पोटात दहशतवाद्यांनी गोळी झाडली होती, त्यात त्यांचा मृत्यू झाला होता.

राहुल शिंदेंना मरणोत्तर राष्ट्रपती पोलीस पदक - त्यांना सर्वोच्च बलिदानाबद्दल सरकारने मरणोत्तर राष्ट्रपती पोलीस पदक देऊन गौरव केला आहे. त्यामुळे सुलतानपूरच्या रहिवाशांनी त्यांच्या गावाचे नाव राहुल शिंदे यांच्या ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र अद्यापही गावाचे नामांतर झाले नाही.

देशासाठी माझ्या मुलाने बलिदान - "गावाच्या नामांतराची सर्व शासकीय औपचारिकता पूर्ण झाली आहे. आम्ही आता अधिकृत नामांतर सोहळ्याची वाट पाहत आहोत," असे दिवंगत राहुल शिंदे यांचे वडील सुभाष विष्णू शिंदे यांनी २६/११च्या हल्ल्याच्या १४व्या स्मृतिदिनाच्या पूर्वसंध्येला सांगितले. "गेल्या 10 वर्षांपासून मी याबाबत सरकारकडे पाठपुरावा करत होतो. अखेर ते पूर्ण झाले. मी आता समाधानी आहे. गावाला माझ्या मुलाचे नाव देण्यात येणार आहे याचा मला आनंद असल्याचे शिंदे यांचे वडिल म्हणाले." देशासाठी माझ्या मुलाने बलिदान दिल्याचे शिंदे यांनी सांगितले.

मला माझ्या मुलाचा अभिमान - "राहुलच्या मृत्यूनंतर, सरकारने आम्हाला आर्थिक मदत केली. मुंबईत फ्लॅट आणि तालुक्यात गॅस एजन्सीही मिळाली, ज्यामुळे कुटुंबाला मदत झाली," झाल्याचे शिंदे यांनी सांगितले. तसेच आमच्या मुलांचा मला अभिमान असल्याचे ते म्हणाले.

बलिदान देण्यास तरुणांनी तयार असले पाहिजे- शिंदे यांनी 2010 मध्ये गावात राहुल यांचे स्मारक उभारले आहे. मुंबई महानगरपालिकेकडून कुटुंबाला मिळालेली 10 लाख रुपयांची मदत स्मारकाच्या उभारणीसाठी वापरली, असे ते म्हणाले. "स्मारकाचा उद्देश तरुणांना प्रेरणा देण्यासाठी आहे. देशासाठी सर्वोच्च बलिदान देण्यास तरुणांनी तयार असले पाहिजे," असे शिंदे यांनी आपले मत व्यक्त केले.

दरम्यान, 26 नोव्हेंबर 2008 रोजी पाकिस्तानातून १० लष्कर-ए-तैयबाचे दहशतवादी मुंबईत घुसले होते. त्यांनी विविध ठिकानी केलेल्या गोळीबारात 18 सुरक्षा कर्मचार्‍यांसह 166 लोक मारले गेले होते तर, अनेक जण जखमी झाले होते. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, ओबेरॉय ट्रायडंट, ताजमहाल हॉटेल, लिओपोल्ड कॅफे, कामा हॉस्पिटल आणि नरिमन हाऊस ज्यू कम्युनिटी सेंटर, आदि ठीकाणांना दहशतवाद्यांनी लक्ष केले होते. यात अजमजल कसाब नावाच्या दहशतवाद्याला जिवंत पकडण्यात सुरक्षा यंत्रणांना यश आले होते. त्याला 21 नोव्हेबर 2012 रोजी पुण्यातील येरवडा कारागृहात फासावर लटकवण्यात आले होते.

Last Updated : Nov 28, 2022, 9:44 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.