ETV Bharat / state

पंढरपूर पोटनिवडणुकीत तिरंगी लढतीचे वारे; 'ही' आहेत इच्छुक उमेदवारांची नावे - भारत नाना भालके

पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघ हा महाविकास आघाडीत असलेल्या राष्ट्रवादीकडे आहे. सध्या भारत नाना भालके यांचे सुपुत्र राष्ट्रवादीच्या संभाव्य उमेदवारांच्या यादीत आघाडीवर आहेत. मात्र राष्ट्रवादीकडून भगीरथ भालके यांना उमेदवारी दिल्यानंतर भाजपकडूनही तोडीस तोड उमेदवार देण्याची तयारी सुरू केली आहे.

Pandharpur bypoll election
पंढरपूर- मंगळवेढा मतदारसंघ पोटनिवडणूक
author img

By

Published : Mar 18, 2021, 7:12 PM IST

पंढरपूर - पंढरपूर- मंगळवेढा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत तिरंगी लढत होण्याची चिन्हे दिसत आहेत. राष्ट्रवादीकडून आमदार भारत नाना भालके यांच्या पत्नी जयश्री भालके यांच्या उमेदवारीची जोरदार चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादीकडून महिला चेहरा समोर येत असल्यामुळे भाजपकडून महिला उमेदवारीबाबत चाचपणी सुरू केली आहे. त्यात पंढरपूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा साधना नागेश भोसले यांचे नाव पुढे आले आहे. दामाजी सहकारी कारखान्याचे चेअरमन समाधान आवताडे यांनी अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी केली आहे.

आमदार भारत नाना भालके यांच्या अकाली निधनानंतर रिक्त झालेल्या पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाची पोटनिवडणूक लागली आहे. पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघ हा महाविकास आघाडीत असलेल्या राष्ट्रवादीकडे आहे. सध्या भारत नाना भालके यांचे सुपुत्र राष्ट्रवादीच्या संभाव्य उमेदवारांच्या यादीत आघाडीवर आहेत. मात्र राष्ट्रवादीकडून भगीरथ भालके यांना उमेदवारी दिल्यानंतर भाजपकडूनही तोडीस तोड उमेदवार देण्याची तयारी सुरू केली आहे. भगीरथ भालके यांच्या उमेदवारीबाबत शंका निर्माण होत आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या वरिष्ठ पातळीवरील नेत्यांकडून जयश्री भालके यांना उमेदवारी द्यावी, अशी मागणी होत आहे. त्यामुळे निवडणूक राष्ट्रवादीसाठी सोपी जाईल तसेच भालके कुटुंबाविषयी सहानुभूतीची लाट आहे. मात्र ,भारत नाना भालके यांच्या सुपुत्र भगीरथ भरते यांच्यापेक्षा जयश्री भालके यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर निवडून येण्याची दाट शक्यता आहे.

हेही वाचा-पंढरपूरच्या पोटनिवडणुकीवर कोरोना नियमावलीच्या मर्यादा

भाजपकडून साधना भोसले यांचे नाव आघाडीवर

राजकीय हालचालींना वेग आलेला असताना परिचारक गटाची भूमिका अजूनही गुलदस्तातच आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसकडून पंढरपूर विधानसभेसाठी जयश्री भालके यांचे नाव पुढे आले तर भाजपकडूनही महिला उमेदवार देण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपकडून पंढरपूर नगरपरिषदेचे नगराध्यक्षा साधना नागेश भोसले यांचे नाव आघाडीवर आले आहे. तर त्याचे पती नागेश भोसले यांचीही पंढरपूरच्या राजकारणावर चांगली पकड आहे. गेल्या सात वर्षांपासून पंढरपूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा म्हणून काम करत आहेत. यामुळे साधना भोसले यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. पण पांडुरंग परिवाराकडून अजून नेमकी भूमिका जाहीर केलेली नाही.

हेही वाचा-पंढरपूर पोटनिवडणुकीपूर्वी सराईत गुन्हेगारांवर हद्दपारीचा प्रस्ताव

रासप व स्वाभिमानीची महाविकास किंवा भाजपकडून उमेदवारी देण्याची मागणी
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेचा पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वीच स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून 'सभासद वाढवा' अभियान सुरू करण्यात आले होते. तसेच पंढरपूर येथे घेण्यात आलेल्या बैठकीमध्ये स्वाभिमानीकडून मतदारसंघावर हक्क सांगण्यात आल आहे. तर महाविकासाकडे या मतदारसंघाची मागणी स्वाभिमानीकडून करण्यात येणार आहे. तसेच रासपचे महादेव जानकर यांनी उमेदवार मैदानात उतरविण्याची घोषणा केली आहे. तर धनगर समाजाकडून होळकर वाडा येथे धनगर समाजबांधवांची बैठक घेण्यात आली. त्यामध्ये धनगर समाजाला या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व मिळाले नाही. त्यामुळे धनगर समाजाकडून राष्ट्रवादी व भाजप यांचेकडे उमेदवारीची मागणी करणार असल्याचे धनगर समाजाचे नेते सुभाष मस्के यांनी केली होती. वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर हे 21 मार्चला पंढरपूर दौऱ्यावर येत आहेत. त्यावेळी वंचित आघाडीचा उमेदवार घोषित होण्याची दाट शक्यता आहे.

समाधान अवताडे यांची अपक्ष लढण्याची तयारी

दामाजी चेअरमन समाधान आवताडे यांच्या नावाची दोन्ही पक्षातून जोरदार चर्चा होत आहे. मात्र, महिला उमेदवार दिल्यानंतर समाधान आवताडे अपक्ष उमेदवारी भरण्याची दाट शक्यता आहे. 2019 साली मंगळवेढा तालुक्यात त्यांना भरघोस अशी मते मिळाली होती. यामुळे पंढरपूर मंगळवेढा मतदार संघामध्ये तिरंगी लढतीचे वारे वाहत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.