सोलापूर - कोरोना विषाणूचा धोका दिवसेंदिवस वाढत चालला आहे. भारतात आत्तापर्यंत शेकडो लोक कोरोना विषाणूने बाधीत झाले आहेत. या पार्श्वभूमीवर कोरोनाच्या आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी करमाळ्याच्या शासकीय रूग्णालयात स्वतंत्र यंत्रणा उभी करण्यात आली आहे.
कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता जिल्हा स्तरावर प्रशासकीय यंत्रणा विविध उपाययोजना करत आहे. बाधित लोकांसाठी प्रशिक्षित डॉक्टर व आवश्यक त्या सर्व तयारीसह स्वतंत्र कक्ष उभारण्यात आला आहे. तसेच लोकांच्या शंकांचे निरसण करण्यासाठी वेगळी व्यवस्था करण्यात आली आहे. लोकशिक्षणासाठी पोस्टव्दारे कोरोना विषाणू, लक्षणे व प्रतिबंधक उपाय योजनांची माहीती दिली जात असल्याचे रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. अमोल डुकरे यांनी सांगितले.
हेही वाचा - कोरोना इफेक्ट : प्रतिबंधासाठी 'डीपीसी'तून आवश्यक निधी देणार - दिलीप वळसे-पाटील
यासोबतच, जिल्ह्यातील विविध धार्मिकस्थळे, शाळा, महाविद्यालय, अभयारण्य आदि तात्पुरत्या स्वरुपात बंद करण्यात आली आहेत. खबरदारी म्हणून नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी गर्दी करु नये, लग्न आणि कौटुंबिक समारंभ गर्दी न करता करावेत किंवा शक्य असल्यास लांबणीवर टाकावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
हेही वाचा - 'कोरोना' प्रभाव : राजेशाही थाटाऐवजी साध्या पद्धतीने लग्नसोहळा उरकण्याचा घेतला जातोय निर्णय