ETV Bharat / state

करमाळ्यात 24 लाखांचा गुटखा जप्त; करमाळा पोलिसांची कारवाई - karmala police

करमाळा पोलिसांनी तब्बल 165 पोती गुटखा पकडला. रात्री गस्त घालत असताना मांगी गावाजवळ ही कारवाई पोलिसांनी केली आहे.

करमाळा पोलिसांची कारवाई
author img

By

Published : Sep 24, 2019, 12:41 PM IST

सोलापूर - टेंभुर्णी-अहमदनगर राज्य मार्गावर 24 लाख 11 हजार रुपये किमतीचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. करमाळा पोलिसांनी केलेल्या या कारवाईमध्ये तब्बल 165 पोती गुटखा पकडला गेला. करमाळा पोलिसांनी रात्री गस्त घालत असताना मांगी गावाजवळ ही कारवाई केली आहे.

24 लाखांचा गुटखा जप्त

सोमवारी पहाटे चार वाजता ट्रकमधून गुटखा जात असल्याची गुप्त माहिती पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांना मिळाली. गुलबर्गा येथून राजस्थानकडे टेंभुर्णी - अहमदनगर मार्गे गुटखा नेला जात होता. करमाळ्यापासून तीन किलोमीटर अंतरावर मांगी गावाजवळ पोलीस गस्त सुरू असताना पहाटे चार वाजता ट्रकमध्ये भरलेल्या पोत्यातून गुटख्याच्या माळा रस्त्यावर पडू लागल्या. त्यामुळे गस्त घालणारे पोलीस वाघमारे व गवंडी यांनी ट्रक थांबवून चौकशी व तपासणी केली. त्यात तब्बल 165 गुटख्याची पोती आढळून आली. पोलिसांनी ट्रकचालक रूपाराम बळीराम चौधरी व क्लिनर कृष्णराम चौधरी यांना ताब्यात घेतले. त्यानंतर अन्न व औषध प्रशासन कार्यालयास कळवून आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव करत आहे.

Intro:mh_sol_02_karmala_gutkha_raid_vis_1_7201168

कारमळ्यात 24 लाखाचा गुटखा जप्त, करमाळा पोलिसांची कारवाई

सोलापूर-

टेंभुर्णी - अहमदनगर राज्यमार्गावर 24 लाख 11 हजार रुपये किमतीचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. करमाळा पोलिसांनी केलेल्या या कारवाई मध्ये तब्बल 165 पोती गुटखा पकडला गेला. करमाळा पोलिसांनी रात्री गस्त घालत असताना मांगी गावाजवळ ही कारवाई केली आहे.
Body:सोमवारी पहाटे चार वाजता मालट्रकमधून गुटखा जात असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांना मिळाली. गुलबर्गा येथून राजस्थानकडे टेंभुर्णी - अहमदनगर मार्गे गुटखा नेला जात होता. करमाळयापासून तीन किलोमीटर अंतरावर मांगी गावाजवळ पोलीस गस्त सुरू असताना पहाटे चार वाजता मालट्रकमध्ये भरलेल्या पोत्यातून गुटख्याच्या माळा रस्त्यावर पडू लागल्याने गस्त घालणारे पोलीस वाघमारे व गवंडी यांनी मालट्रक थांबवून चौकशी व तपासणी केली त्यात तब्बल 165 गुटख्याची पोती आढळून आली.ट्रकचालक रूपाराम बळीराम चौधरी व क्लिनर कृष्णराम चौधरी यांना ताब्यात घेतले आले असून अन्न व औषध प्रशासन कार्यालयास कळविण्यात आले असून गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव हे करीत आहेत.

बाईट - 1 - सर्जेराव पाटील ( पोलीस निरीक्षक करमाळा )Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.