पंढरपूर (सोलापूर)- करमाळा तालुक्यातील 173 सहकारी संस्था नोंदणी रद्द करण्याची नोटीस सहकार निबंधक कार्यालयाने बजावली आहे. या 173 सहकारी संस्थांनी तीन वर्षाहून अधिक काळ लेखापरीक्षण करून घेतले नाही. त्यामुळे या नोटीस बजाविण्यात आल्या आहेत. लेखापरीक्षण न केल्यास परवाना रद्द करण्याचा इशारा निबंधक कार्यालयाकडून संबंधित संस्थांना देण्यात आला आहे.
करमाळा तालुक्यात 343 पैकी 173 संस्थाना नोटीस सहकार निबंधक कार्यालयाने बजावली आहे. यामध्ये सहाय्यक निबंधक कार्यालयाकडून करमाळा तालुक्यातील विविध कार्यकारी सेवा सोसायट्या, नागरी पतसंस्था, पगारदार पतसंस्था, मजूर संस्था, ग्राहक संस्थांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे पाणी पुरवठा, वाहतूक, औद्योगिक, प्रक्रिया, बलुतेदार, गृहनिर्माण, नागरी बँका, फळे, भाजीपाला, पाणी वापर, प्रक्रिया संस्था, प्राथमिक ग्राहक आणि इतर नावीन्यपूर्ण प्रकारच्या सहकारी संस्थांचा समावेश आहे.
हेही वाचा-घाऊक बाजारपेठेत २.०३ टक्क्यांनी वाढली महागाई
संस्थांना वार्षिक सर्वसाधारण सभा बंधनकारक
गेल्या महिन्यापासून सहकारी संस्थांच्या धोरणामुळे सर्व कामे ठप्प झाली आहेत. मात्र, प्रशासनाने या काळात सहकारी संस्थांना लेखा परीक्षण करण्याबाबत सवलत दिली होती. ही मुदत सर्व संस्थांना 31 डिसेंबर अखेरपर्यंत देण्यात आली होती मात्र तरीही 173 संस्थांकडून लेखा परिक्षण न केल्यामुळे निबंधक कार्यालयाकडून नोटीस देण्यात आल्या आहेत. आर्थिक वर्ष संपल्यानंतर प्रत्येक वर्षी सहकारी संस्थांचे लेखापरीक्षण 31 जुलैअखेर करून घेऊन 30 सप्टेंबरपूर्वी वार्षिक सर्वसाधारण सभा घेणे बंधनकारक आहे.
हेही वाचा-महागाईत आणखी भडका: घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात ५० रुपयाने वाढ