पंढरपूर (सोलापूर)- करमाळा तालुक्यातील उजनी जलाशय परिसरात अवैधरित्या वाळू उपसा व वाहतूक केली जात आहे. अवैधरित्या वाळू उपसा करणाऱ्या तीन यांत्रिक बोटींवर करमाळा महसूल पथकाने कारवाई केली आहे. या ठिकाणावरून तीन बोटींसह, वाळू असा ४० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामध्ये संशयित व्यक्तींना ताब्यात घेण्यात आले आहे.
पोलिसांकडून संशयित व्यक्ती ताब्यात
उजनी परिसरामध्ये महसूल व पोलिस प्रशासनाकडून अवैधरित्या वाळू उपसा करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत इमरान शेख, हनीफ शेख, नसीब शेख, काळू शेख (रा. झारखंड) या राज्यातील व्यक्तींना ताब्यात घेण्यात आले आहे.
तहसीलदार समीर माने यांच्या पथकाची कारवाई
उजनी परिसरामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून अवैधरित्या वाळू उपसा सुरू आहे.अशी माहिती करमाळा तहसीलदार समीर माने यांना मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे तहसीलदार व त्यांच्या पथकाने अवैधरित्या वाळू उपसा सुरू असताना छापा टाकला. यावेळी अवैधरित्या वाळू उपसा करणाऱ्या तीन यांत्रिक बोटींवर पथकाने कारवाई केली आहे. या बोटी जप्त करण्यात आले असून या कारवाईमध्ये सुमारे ४० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
हेही वाचा-कोल्हापूर : आजरा येथे विदेशी बनावटीच्या मद्याची तस्करी; २० लाखांचा मुद्देमाल जप्त