सोलापूर: बृजभूषण शरण सिंह विरोधात सात कुस्तीगिरांनी केलेल्या लैंगिक शोषणाच्या आरोपानंतर भारतात वादळ उठले आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाअध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी ब्रजभूषणवर कारवाईची मागणी केली आहे. बृजभूषणविरोधात दोन गुन्हे दाखल करण्यात आले. यातील एक गुन्हा पोक्सो कायद्यांतर्गत नोंदवण्यात आला आहे. संसद भवनाच्या उदघाटनवेळी आंदोलन कर्त्यांनी पोलिसांनी आंदोलन ठिकाणहुन हटविले होते. यावेळी झटापटीत बृजभूषण विरोधात आंदोलन करणारे जखमी झाले होते. पोलिसांनी आंदोलन चिरडून टाकण्याचा प्रयत्न केला, पोलिसांना सरकारने आदेश दिला म्हणून हे आंदोलन चिरडले गेले, असा आरोप विरोधी पक्षाचे नेते करत आहेत. जयंत पाटील यांनी देखील पोलिसांनी केलेल्या कारवाईचा विरोध करत, बृजभूषणवर कारवाईची मागणी केली आहे.
बृजभूषणविरोधात दोन गुन्हे दाखल करण्यात आले. आंदोलन कर्त्यांनी पोलिसांनी आंदोलन ठिकाणहुन हटविले होते. यावेळी झटापटीत आंदोलन करणारे जखमी झाले. पोलिसांना सरकारने आदेश दिला म्हणून हे आंदोलन चिरडले गेले, बृजभूषणवर कारवाईची केली पाहिजे. - प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील
ब्रजभूषण शरण सिंहावर गंभीर आरोप: महिला कुस्तीगीर खेळाडूंनी पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीतील मजकूर उघड झाला आहे. यामध्ये बृजभूषण यांच्यावर गंभीर आरोप केल्याच दिसून आला आहे. बृजभूषण शरण सिंह यांच्यावर आरोप करणाऱ्या सात महिला खेळाडूंपैकी दोन खेळाडूंनी त्यांचे अनेक वेळा लैंगिक शोषण झाल्याचे म्हटले आहे. बृजभूषण सिंह यांनी त्यांचा श्वासोच्छवास तपासण्याच्या बहाण्याने चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला आणि लैंगिक शोषण केले, असा दावा दोन तक्रारदारांनी केला. कुस्ती महासंघाचे अध्यक्ष म्हणून त्यांचा असलेला प्रभाव आणि आपल्या करिअरचे नुकसान टाळण्यासाठी याबाबत कुठे उल्लेख केला नव्हता, असेही महिला खेळाडूंनी म्हटले आहे. पण बृजभूषण यांनी मात्र आपल्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत.
जयंत पाटलांचा सोलापूर दौरा: माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे सोलापूर दौऱ्यावर आले होते. सोलापुरातील माजी आमदार दिलीप माने यांच्या मुलाच्या लग्न समारंभ कार्यक्रमासाठी जयंत पाटील सोलापूरला आले होते. माकप नेते नरसयया आडम यांच्या घरी जाऊन जयंत पाटील यांनी भेट घेतली. भेटी नंतर जयंत पाटलांनी बृजभूषण शरण सिंहवर कारवाईची मागणी केली.
हेही वाचा -