ETV Bharat / state

लाच घेताना औद्योगिक प्रशिक्षण केंद्राचा निदेशक जाळ्यात - आटीआय सोलापूर बातमी

सोलापुरातील एका महाविद्यालयास क्रॉप सायन्सचा परवाना देण्यासाठी सांगळे यांनी 20 हजार रुपयांची लाच मागितली होती. रविवारी (दि. 12 जुलै) लाच घेताना औद्योगिक प्रशिक्षण केंद्रचे निदेशक स्वप्नील सांगळे यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे.

प्रतिकात्मक छायाचित्र
प्रतिकात्मक छायाचित्र
author img

By

Published : Jul 13, 2020, 12:27 AM IST

सोलापूर - आयटीआयमधील (औद्योगिक प्रशिक्षण केंद्र) भ्रष्टाचार उघडकीस आला आहे. निदेशक स्वप्नील दत्तात्रय सांगळे (रा. निर्मिती विहार, आदित्य नगर, विजापूर रोड, मूळ रा. वरवड ता दौंड) यास वीस हजार रुपयांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या सोलापूर कार्यालयातील पथकाने रंगेहाथ पकडले आहे. सोलापुरातील एका महाविद्यालयास क्रॉप सायन्सचा परवाना देण्यासाठी सांगळे यांनी 20 हजार रुपयांची लाच मागितली होती. रविवारी (दि. 12 जुलै) लाच घेताना निदेशक स्वप्नील सांगळे यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे.

विजयसिंह मोहिते-पाटील कनिष्ठ महाविद्यालयाने अकरावी व बारावीसाठी क्रॉप सायन्स या अभ्यासक्रमाचा ऑनलाईन प्रस्ताव शासनाला सादर केला होता. त्यानुसार औद्योगिक प्रशिक्षण केंद्रमधील निदेशक स्वप्नील सांगळे यांना संबंधित महाविद्यालयाची पाहणी करून शासनाकडे अहवाल सादर करायाचा होता. त्यासाठी सांगळे यांनी महाविद्यालय प्रशासनाला 20 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.

अकरावी व बारावीतील विद्यार्थ्यासाठी क्रॉप सायन्स अभ्यासक्रमास मान्यता मिळावी, असा प्रस्ताव महाविद्यालयातर्फे कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालायातील सचिवांना ऑनलाइन अर्ज पाठविला होता. त्यानुसार संबंधित महाविद्यालयाची पाहणी करून शिफारसीसह फेर प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश सोलापुरातील औद्योगिक प्रशिक्षण केंद्राचे निदेशक सांगळे यांना शासनाकडून देण्यात आले होते. यासाठी दत्तात्रय सांगळे यांनी महाविद्यालयास 20 हजार लाचेची मागणी केली होती.

मात्र, महाविद्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांन लाच द्यायची नव्हती. त्यामुळे त्यांनी लाचलुतपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. रविवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा लावला. दत्तात्रय सांगळे हे लाच घेताना रंगेहाथ जाळ्यात अडकले. ही कारवाई पोलीस निरक्षक कविता मुसळे, जगदीश भोपळे, हवालदार संजय कुमार बिराजदार, प्रसाद पकाले, अर्चना स्वामी यांच्या पथकाने कारवाई केली.

हेही वाचा - सोलापुरात हॉटल मॅनेजरचा खून; संशयाची सुई वस्तादवर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.