ETV Bharat / state

विठ्ठल साखर कारखान्याने शेतकऱ्यांच्या नावे काढले परस्पर कर्ज, पोलीस कर्मचाऱ्याचा आरोप

author img

By

Published : Jun 1, 2021, 5:03 PM IST

Updated : Jun 1, 2021, 5:25 PM IST

करमाळा तालुक्यातील म्हैसगाव येथील विठ्ठल सहकारी साखर कारख्याने तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांच्या नावे परस्पर कर्ज काढल्याचा आरोप काही शेतकऱ्यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.

सोलापूर
सोलापूर

सोलापूर - करमाळा येथील म्हैसगावातील विठ्ठल कार्पोरेशन साखर करखान्याने करमाळा तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांच्या नावे परस्पर कर्ज काढले असल्याची धक्कादयाक माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. यावेळी पत्रकार परिषदेत रणजित भोगल, प्रदीप ढवळे, अतुल खूपसे, माऊली हळनवार, अशोक भोगल यांनी दिली. रणजित भोगल हे पिंपरी चिंचवड येथे पोलीस दलात कार्यरत आहेत. ते करमाळा येथील रहिवासी आहेत. त्यांच्या नावे देखील जवळपास सव्वा लाखाचे बोगस कर्ज 2013 साली काढले असल्याची माहिती देण्यात आली. सोलापूर ग्रामीण पोलीस दलाचे अधीक्षक यांनी लक्ष घालून हे कृत्य करणाऱ्या साखर कारखान्याच्या संचालकांविरुद्ध फसवणूकीचे गुन्हे दाखल करावे आणि सर्व शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा, अशीही मागणी शेतकरी संघटनेचे नेते अतुल खूपसे यांनी केली आहे.

बोलताना रणजित भोगल

22 कोटी 11 लाखांचे कर्ज शेतकऱ्यांच्या नावे काढले असल्याची माहिती

विठ्ठल कार्पोरेशन या साखर कारखान्याने करमाळा तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांकडून 2013 साली खत देतो, असे सांगून त्यांच्या कडील कागदपत्रे घेतली होती. त्याच आधारावर त्यांनी कर्ज काढले असल्याची माहिती यावेळी पत्रकार परिषदेत देण्यात आली. तब्बल 22 कोटी 11 लाखांचे कर्ज काढण्यात आले आहे. याबाबत जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना निवेदन देऊन संबंधित फसवणूक करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.

कोथरूड बँकेतून नोटिसा

करमाळा येथील शेतकऱ्यांना काही दिवसांपासून कोथरूड येथील पंजाब नॅशनल बँकेच्या नोटिसा येऊ लागल्या आहे. त्यांनी त्याबाबत अधिक चौकशी केली असता करमाळा येथील स्थानिक आमदाराने आपल्या नावावर परस्पर कर्ज काढले असल्याची माहिती समोर आली. पण, अनेक शेतकऱ्यांनी गप्प राहण्यातच आपली भलाई मानली. पोलीस ठाण्यात तक्रार देखील करायला गेले नाही, अशी खंत शेतकरी संघटनेचे नेते अतुल खूपसे यांनी व्यक्त केली.

पोलिसाला घर खरेदीसाठी सिबील स्कोर कमी झाल्याने अडचण

रणजित भोकल हे पिंपरी-चिंचवड येथे शहर पोलीस दलात कार्यरत आहेत. त्यांच्या नावे कारखान्याने कर्ज काढले आहे. याबाबत त्यांना कोणतीही माहिती नसल्याने त्यांनी बँकेच्या कर्जाकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे त्यांचे सिबील स्कोर खराब झाले आहे. आता या पोलीस कर्मचाऱ्याला पिंपरी-चिंचवड येथे घर घेण्यासाठी गृहकर्ज घ्यायचे आहे. पण, त्यांचे सिबील स्कोर कमी असल्याने त्यांना घर घेण्यासाठी इतर बँकांनी कर्ज नाकारला आहे, अशी माहिती फसवणूक झालेल्या पोलिसाने दिली आहे. तर माझी समस्या सुटली नाही तर माझ्या कुटुंबियांना बँकेत आंदोलनास बसणार असल्याची माहिती दिली.

हेही वाचा - शरद पवारांनी बोलवली राष्ट्रवादीच्या नेत्यांची तातडीची बैठक; चर्चांना उधाण

Last Updated : Jun 1, 2021, 5:25 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.