ETV Bharat / state

आयपीएल सट्टाबाजार : सोलापूर शहरातून एका बुकीस अटक - solapur police

आयपीएल सामन्यांवर सट्टा घेणाऱ्या बुकीला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून मोबाईल फोन आणि 20 हजार रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली आहे. सट्टा बुकी जाविद लुंजेवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आयपीएल सट्टाबाजार
आयपीएल सट्टाबाजार
author img

By

Published : Nov 5, 2020, 8:36 AM IST

सोलापूर - शहरातून आयपीएल सामन्यांवर सट्टा घेणाऱ्या बुकीला अटक करण्यात आली आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्यात याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. मोहम्मद जाविद नासिरोद्दीन लुंजे (रा. शिवगंगा नगर, नई जिंदगी परिसर,सोलापूर) असे संशयित आरोपीचे नाव आहे. त्याच्या मोबाईलवरून इतरही बुकींचा शोध घेतला जात आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धा सुरू झाल्यापासून सट्टा बाजार फुलला होता.

संशयित आरोपी जाविद लुंजे हा फोनच्या माध्यमातून आयपीएल क्रिकेटवर सट्टा लावून लोकांकडून पैसे घेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार गुन्हे शाखेच्या पोलिसांनी नई जिंदगी परिसरातील संशियित आरोपीवर पाळत ठेवली होती. 2 नोव्हेंबरला आरोपीला अटक करण्यासाठी गेले असताना त्याने पोलिसांना धक्काबुक्की करत पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्याला अटक करून गुन्हे शाखेच्या कार्यालयात आणले. त्याच्याकडून मोबाईल फोन आणि 20 हजार रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली आहे. सट्टा बुकी जाविद लुंजेवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता -

सट्टा बाजार हा विस्तारलेला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींची चौकशी केल्यास, शहरातील सट्टा बाजारातील मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता आहे. अनेक तरुण आयपीएल सट्टा बाजारामुळे कर्जबाजारी होत आहेत.

सट्टा बाजाराची सूत्रे ग्रामीण भागात -

मोबाईलद्वारे सट्टा बाजार चालत असल्याने कोणत्याही ठिकाणाहून सट्टा बुकींग करता येते. त्यामुळे बुकी साधारणत: शहरी भागात राहणे टाळतात. ग्रामीण भागातील शेतातून सट्टा बाजाराची सुत्रे हलत असल्याची माहिती पुढे येत आहे. त्यामुळे आयपीएल सट्टा बाजारात ग्रामीण भागातील तरूण देखील ओढवले जात आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.