ETV Bharat / state

अपक्ष उमेदवाराने भालके अन् आवताडेंवर घेतला आक्षेप अर्ज निवडणूक आधिकाऱ्यांनी फेटाळला - पंढरपूर-मंगळवेढा बातमी

पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीतील भाजपचे उमेदवार समाधान आवताडे व विकास आघाडीतील राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांच्या दोन्ही कारखान्यातील आरआरसीची रक्कम थकीत असल्यामुळे उमेदवारी नामंजूर करावी, अशा प्रकारचा अर्ज अपक्ष उमेदवार माऊली हळणवर यांनी निवडणूक आयोगाकडे केली. मात्र, निवडणूक आयोगाने अधिकाऱ्यांनी अर्ज फेटाळून लावला आहे.

माऊली हळणवर
माऊली हळणवर
author img

By

Published : Apr 1, 2021, 7:13 AM IST

Updated : Apr 1, 2021, 9:45 AM IST

पंढरपूर (सोलापूर) - पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीतील भाजपचे उमेदवार समाधान आवताडे व विकास आघाडीतील राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांच्या दोन्ही कारखान्यातील आरआरसीची रक्कम थकीत असल्यामुळे उमेदवारी नामंजूर करावी, अशा प्रकारचा अर्ज अपक्ष उमेदवार माऊली हळणवर यांनी निवडणूक आयोगाकडे केली. मात्र, निवडणूक अधिकारी गजानन गुरव यांनी समाधान आवताडे व भगीरथ भालके यांच्या उमेदवारीवर घेतलेला आक्षेप फेटाळून लावला दोन्ही उमेदवाऱ्यांचा अर्ज मंजूर करण्यात आली.

बोलताना अपक्ष उमेदवार

विठ्ठल व दामाजी सहकारी कारखाना 77 कोटी रुपयांची आरआरसी थकीत

पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीची चांगली रंगात आली आहे. विठ्ठल साखर कारखान्याचे अध्यक्ष भगीरथ भालके यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत तर दामाजी साखर कारखान्याचे अध्यक्ष समाधान आवताडे हे भाजपचे उमेदवार अध्यक्ष आहेत. त्यामुळे दोन्ही कारखान्यांवर शेतकऱ्यांची 77 कोटी रुपयांची आरआरसीची थकीत आहेत. यामुळे दोन्ही उमेदवाऱ्यांची उमेदवार नामंजूर करावी, असाही मागणी हळणवर यांनी केली. दरम्यान, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी याबाबतचा निर्णय राखून ठेवला होता. यावर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी आणि भाजपच्या उमेदवारांचे अर्ज मंजूर केले.

उच्च न्यायालयात घेणार धाव

भगिरथ भारत भालके व समाधान महादेव आवताडे यांच्या उमेदवारी अर्जावर हरकती घेण्यात आल्या होत्या. निवडणूक निर्णय अधिकारी गुरव हरकती फेटाळून अर्ज वैध ठरविण्यात आले. यावेळी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी सुशिल बेल्हेकर, स्वप्निल रावडे उपस्थित होते. मात्र, भगीरथ भालके व समाधान अवताडे यांच्या उमेदवारी अर्जावर हरकत फेटाळल्या नंतर याबाबत उच्च न्यायालयात माऊली हळणवर, सचिन पाटील यांनी धाव घेणार आहेत, अशी माहिती माऊली हळणवर यांनी दिली.

हेही वाचा - शिवसेना पक्षप्रमुखांनी केलेली कारवाई अपेक्षित - शैलजा गोडसे

Last Updated : Apr 1, 2021, 9:45 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.