पंढरपूर (सोलापूर) - जिल्ह्यामध्ये कोरोनाची परिस्थिती चिंताजनक झाली आहे. ग्रामीण भागातल्या वाड्या-वस्त्यांपर्यंत कोरोनाने आपला शिरकाव केला आहे. पंढरपूर, माळशिरस, माढा, करमाळा तालुक्यात कोरोना उद्रेक मांडला आहे. आज पंढरपूर व माढा तालुक्यात आज एक हजार रुग्ण आढळून आले आहेत. सोलापूर जिल्ह्यामध्ये 16 हजार 700 रुग्णही विविध कोविड सेंटर व कोविड हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे. जिल्ह्यातील मृत्यू दरही इतर जिल्ह्याच्या तुलनेत मोठा आहे. ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था अपुऱ्या प्रमाणात असल्यामुळे मृत्यू दरात वाढ होताना दिसत आहे.
पंढरपूर, माळशिरस, माढा तालुक्यात ठरतायत हॉटस्पॉट
शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात कोरोना धोकादायक अवस्थेत पोहोचला आहे. सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये सर्वाधिक रुग्णांची नोंद होत आहेत. पंढरपूर, मंगळवेढा, माळशिरस, करमाळा, सांगोला तालुके इतर तालुक्याच्या तुलनेत कोरोनाने प्रभावित झाले आहेत. या पाचही तालुक्यांमध्ये 70 टक्के कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत. त्यातील पंढरपूर, माळशिरस, माढा तालुक्यामध्ये एका दिवसात बाराशेच्या आसपास रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे या तालुक्यातील गावे कोरोनाच्या विळखामध्ये येताना दिसत आहेत. या गावातील आरोग्य यंत्रणाही अपुऱ्या प्रमाणात आहे.
सोलापूर जिल्ह्यात वाढणारा मृत्यूदर चिंतेचा विषय
सोलापूर जिल्ह्यातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून योग्य ते उपाययोजना करण्यात येत आहेत. सोलापूर जिल्ह्यातील लसीचा असणारा तुटवडा हा मोठा चिंतेचा विषय ठरत आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात वेळेत उपचार न मिळाल्यामुळे रुग्णांच्या मृत्यूचा दरही वाढत आहेत. आज आलेल्या अहवालानुसार 33 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा कुचकामी ठरत असल्याचे दिसून येत आहे. शहरी भागात होणारे उपचार ग्रामीण भागात पोचू शकले नाहीत. ग्रामीण भागामध्ये 14 हजार 820 कोरोना बाधित रुग्ण हे उपचार घेत आहेत. तर त्या तुलनेत नागरी भागामध्ये 1882 कोरोना रुग्णवर विविध हॉस्पिटलमध्ये उपचार चालू आहे.
जिल्हा प्रशासनाकडून दहा दिवसाची संचारबंदी
सोलापूर जिल्ह्यामध्ये रोज वाढणारी कोरोनाची रुग्ण संख्या चिंतेचा विषय ठरली आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी संपूर्ण जिल्ह्यामध्ये दहा दिवसाची संचारबंदी लागू करण्याचे आदेश दिले आहेत. सध्या सोलापूर जिल्ह्यातील नागरी भागामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील गावांसाठी दहा दिवसांची संचारबंदीची आवश्यकता असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. ही संचारबंदी 21 मेपासून एक जूनपर्यंत असणार आहे. सोलापूर शहर वगळता संपूर्ण जिल्ह्यामध्ये ही संचारबंदी लागू असणार आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाला कडक उपाय योजना राबवण्यात भर द्यावी लागणार आहे.
पंढरपूर, माढा, माळशिरस तालुक्यात कोरोना परिस्थिती धोकादायक - सोलापूर करोना लेटेस्ट न्यूज
सोलापूर जिल्ह्यामध्ये रोज वाढणारी कोरोनाची रुग्ण संख्या चिंतेचा विषय ठरली आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी संपूर्ण जिल्ह्यामध्ये दहा दिवसांची संचारबंदी लागू करण्याचे आदेश दिले आहेत.