ETV Bharat / state

शरद पवारांच्या भूमिकेमुळे जिल्ह्यातील महत्त्वाचे प्रकल्प प्रलंबित - रणजितसिंह नाईक निंबाळकर

राज्य सरकार व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विरोधामुळे व केंद्राच्या प्रकल्पाला मदत न करण्याच्या भूमिकेमुळे दोन्ही प्रकल्प प्रलंबित असल्याची टीका खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केली आहे.

important projects in district are pending because of sharad pawar said Ranjit Singh Naik Nimbalkar
शरद पवारांच्या भूमिकेमुळे जिल्ह्यातील महत्त्वाचे प्रकल्प प्रलंबित - रणजितसिंह नाईक निंबाळकर
author img

By

Published : Jul 17, 2021, 8:53 PM IST

पंढरपूर - राज्यातील अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या कृष्णा-भीमा स्थिरीकरण प्रकल्प व पंढरपूर लोणंद रेल्वे मार्गासाठी केंद्र सरकार अनुकूल आहेत. परंतु राज्य सरकार व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विरोधामुळे व केंद्राच्या प्रकल्पाला मदत न करण्याच्या भूमिकेमुळे दोन्ही प्रकल्प प्रलंबित असल्याची टीका माढा मतदार संघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केली आहे.

प्रतिक्रिया

निंबाळकरांची उपोषणकर्त्यांशी चर्चा -

अकलूज माळेवाडी ग्रामपंचायतीचे नगर परिषदेत व नातेपुते ग्रामपंचायतीचे नगरपंचायती रूपांतर करण्याच्या मागणीसाठी 22 जूनपासून तीनही गावचे नागरिक साखळी उपोषण करत आहेत. उपोषणाच्या 25 व्या दिवशी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी भेट देऊन उपोषणकर्त्यांशी चर्चा केली. भाजप नेत्या चित्रा वाघ, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनीही या उपोषणाला भेट देऊन राज्य सरकारविरोधात जोरदार मोर्चा उघडला होता.

'ही योजना हाणून पाडण्याचा राष्ट्रवादीचा डाव' -

पंढरपूर-लोणंद रेल्वेमार्गाच्या सर्वेक्षणाचे काम अंतिम टप्प्यात आहे. याचा अहवाल आल्यानंतर यासाठी निधी उपलब्ध होणार आहे. प्रस्तावित असलेल्या मुंबई-हैदराबाद बुलेट ट्रेनचा मार्ग बदलण्यात येणार नसल्याचे स्पष्टीकरण देतानाच त्यांनी कृष्णा भीमा स्थिरीकरण योजना हाणून पाडण्याचा राष्ट्रवादीचा डाव असल्याचा आरोप खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केला आहे. दरम्यान, सोलापूर जिल्ह्याच्या विकासासाठी केंद्र सरकारची निधी द्यायची तयारी आहे. परंतु आपला वाटा देण्यास राज्य सरकार तयार नाही. यामुळेच हा विषय प्रलंबित राहत असल्याचे खासदार नाईक निंबाळकर यांनी सांगितले. यावेळी उपसरपंच शिवतेज सिंह मोहिते पाटील, भाजपा जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख, सातारा जिल्हा भाजपाचे उपाध्यक्ष जयकुमार शिंदे, स्वराज्य पतसंस्थेचे चेअरमन अमरसिंह नाईक निंबाळकर यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी पाठिंब्याचे निवेदन दिले.

हेही वाचा - शरद पवारांच्या वरदहस्तामुळेच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदावर - खासदार अमोल कोल्हे

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.