ETV Bharat / state

शेतकऱ्यांना वेळीच मदत न केल्यास रस्त्यावर उतरू - राजू शेट्टी

केंद्र आणि राज्य सरकारने तातडीने शेतकयांना मदत न दिल्यास आम्ही रस्त्यावरची लढाई लढू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला.

Former MP Raju Shetty
माजी खासदार राजू शेट्टी
author img

By

Published : Oct 19, 2020, 7:19 PM IST

पंढरपूर - शेती नुकसानाची पाहाणी न करता, शेतकऱ्यांना तात्काळ भरीव मदत जाहीर करावी. केंद्र आणि राज्य सरकारने तातडीने शेतकऱ्यांना मदत न दिल्यास आम्ही रस्त्यावरची लढाई लढू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला.

भीमा नदीला पूर आल्याने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांची पाहणी करण्यासाठी माजी खासदार राजू शेट्टी पंढरपूरला आले होते. राजू शेट्टी म्हणाले, हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्याकडे जिल्हा व आपत्ती व्यवस्थापन प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. भीमा नदीत दुपारी ५ हजार क्युसेक पाणी सोडण्यात आले होते आणि रात्री अचानक लाखाचा विसर्ग सोडण्यात आला. नागरिक जीव जाण्याच्या भीतीने तत्काळ स्थलांतरित झाले.

अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. कोलमडलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा उभे करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या मदतीची गरज आहे. राज्य सरकारने १५ हजार कोटी रुपये व केंद्र सरकारने केंद्रीय आपत्ती निवारण निधीतून ३५ हजार कोटी रुपयाची भरपाई द्यावी,अशी मागणी राजू शेट्टी यांनी केली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री होण्याआधी मागील वर्षी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना एकरी २५ हजार रुपये नुकसानभरपाई देण्याची मागणी केली होती. आता तर ठाकरे मुख्यमंत्री आहेत. त्यांनी तात्काळ शेतकऱ्यांना मदत द्यावी. केंद्र सरकारनेही हात झटकू नयेत. सरकारने वेळीच मदत न केल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरून लढाई लढेल, असा इशारा शेट्टी यांनी दिला.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.