सोलापूर sanjay Raut On Bjp : खासदार संजय राऊत आज (रविवारी) सोलापूर दौऱ्यावर आहेत. आज दिवसभर ते विविध कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. तसंच उद्धव बाळासाहेब ठाकेर (उबाठा ) गटाच्या कार्यकर्तांशी संवाद साधणार आहेत. सकाळी दौरा सुरू करण्यापूर्वी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन भारतीय जनता पक्षावर (भाजपा) गंभीर आरोप केले आहेत.
2024 च्या निवडणुकीपूर्वी भाजपा बॉम्बस्फोट करेल : 2024 च्या निवडणुकीपूर्वी भाजपा बॉम्बस्फोट करेल, अशी भीती खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे. त्याशिवाय भाजपा निवडणूक जिंकू शकत नाही, असं देखील संजय राऊत यांनी यांनी म्हटलं आहे. राम मंदिराचा मुद्दा घेऊन भाजपा उत्तर प्रदेशसह उत्तर भारतातील राज्यांमध्ये मार्केटींग करत असल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे. भाजपा भारतातील बेरोजगारीच्या समस्येवर काहीच बोलत नाही. भाजपाचं असं राजकारण किती दिवस चालणार? असा प्रश्न संजय राऊत यांनी केला आहे.
देशात मोदी, शाहांची चलती : देशात फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी तसंच गृहमंत्री अमित शाह फिक्स आहेत, बाकी कोणी नाही. राजस्थानात भाजपाची सत्ता आली आहे. मात्र माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांना भाजपानं रोखून धरल्याची चर्चा सुरू आहे. याबाबत संजय राऊत यांना अधिक माहिती विचारली असता, ते म्हणाले की, भाजपशासित राज्यात मुख्यमंत्री कोण होणार याचा निर्णय पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शाह घेतात. भाजपात फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांची चलती आहे. त्यामुळं मुख्यमंत्री, मंत्री, राज्यपाल निश्चित नसतात, असा टोला त्यांनी भाजपाला लागावला आहे.
भाजपाचा काळाबाजार : पुलवामा घटनेनंतर तत्कालीन राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी भाजपाचा काळाबाजार बाहेर आणला होता. त्यावर भाजपानं अजूनही उत्तर दिलेलं नाही. मलिक यांच्या प्रश्नाचं उत्तर भाजपात देण्याची हिंमत नाही. त्यांचा रामलल्लाचा विषय आता जवळपास संपला आहे. त्यामुळं ते निवडणुकीपूर्वी वेगळा विषय घेऊन येतील. जातीय तेढ निर्माण केल्याशिवाय भाजपाला निवडणूक कशी जिकंता येईल असं टोला संजय राऊत यांनी लगावला आहे. याबाबत प्रकाश आंबेडकर यांनी देखील भीती व्यक्त केली आहे. निवडणुकीपूर्वी देशात मोठा नरसंहार होणार असल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटंल आहे. हा नरसंहार फक्त हुकूमशाच घडवू शकतो, असं टीकास्त्र संजय राऊत यांनी मोदींवर सोडलं आहे.
हेही वाचा -