ETV Bharat / state

माळशिरसमध्ये कूकची गळा दाबून हत्या, हॉटेल मालकासह तिघांना अटक

हॉटेलमधील कूकचा मालकाने गळा दाबून खून केल्याचे तीन महिन्यांनी उघड झाले आहे. माळशिरस तालुक्यातील जळभावी ते गोरवाडी रोडवर गारवडपाटीवर ही घटना घडली आहे. दरम्यान, अहिल्या हॉटेल मालक भाऊ हुलगेसह तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. सुरेश गणपत कांबळे (रा. पिंपळे गुरव, पुणे) असे हत्या झालेल्या कूकचे नाव आहे.

पंढरपूर
पंढरपूर
author img

By

Published : May 31, 2021, 3:57 AM IST

पंढरपूर - पंढरपूर तालुक्यातील जैनवाडी गावच्या कॅनॉलमध्ये तीन महिन्यापूर्वी पायाला व कमरेला काळी दोरी बांधलेल्या अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. पंढरपूर ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला आहे. पोलिसांनी तपास करत असताना तो मृतदेह पुणे जिल्ह्यातील पिंपळे गुरव या गावातील राहणारे सुरेश गणपत कांबळे यांचा असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पंढरपूर ग्रामीण पोलिसांनी संशयित लोकांची माहिती काढली. याप्रकरणी हॉटेल मालकासह दोन साथीदारांना पोलिसांनी अटक केली आहे.

माळशिरसमध्ये कूकची गळा दाबून हत्या, हॉटेल मालकासह तिघांना अटक

तीन महिन्यानंतर खुनाचा उलगडा

हॉटेल चालकाने आपल्याच दोन साथीदारांच्या मदतीने दारू पिऊन शिवीगाळ करतो म्हणून हॉटेलमधील कूकचा (सुरेश गणपत कांबळे) गळा आवळून खून केला होता. त्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न आरोपींनी केला होता. दोन्ही पाय व कमरेला दोरीने दगड बांधून माळशिर तालुक्यातील कॅनॉलमध्ये मृतदेह फेकून दिला होता. तो मृतदेह पंढरपूर तालुक्यातील जैनवाडी येथील कॅनॉलमध्ये आढळला होता. याप्रकरणी भाऊ हुलगे, भानुदास हुलगे, हनुमंत निवृत्ती गोरड (सर्व रा. गोरडवाडी ता. माळशिरस जि. सोलापूर) यांना तीन महिन्यानंतर अटक करण्यात आली आहे. पंढरपूर ग्रामीण पोलिसांच्या पथकाने केलेल्या कौशल्यपूर्ण तपासामुळे तीन महिन्यांपूर्वी झालेल्या या खुनाचा उलघडा करण्यात पोलिसांना यश आले आहे.

ग्रामीण पोलिसांकडून तीन आरोपींना अटक

सुरेश गणपत कांबळे हा माळशिरस तालुक्यातील गारवडपाटी येथील हॉटेल अहिल्यामध्ये कूक म्हणून गेल्या १० ते १५ वर्षांपासून काम करत होता. मात्र, काही दिवसांपासून त्याला दारूचे व्यसन जडले होते. त्यातच हॉटेल मालक व त्यांच्या घरच्यांना तो सतत शिवीगाळ करत होता. त्यामुळे कंटाळून हॉटेल मालक भाऊ हुलगेने त्याचा कायमचा काटा काढण्याचे ठरवले. त्याचप्रमाणे 4 फेब्रुवारी रोजी हॉटेल मालकाने सर्व कामगारांना सुट्टी दिली. त्यानंतर हॉटेल मालक व त्याच्या दोन साथीदारांनी सुरेश कांबळेचा हॉटेलमध्ये काम करत असताना गळा आवळून खून केला. तो मृतदेह आपल्या स्कॉर्पिओ गाडीतून माळशिरस तालुक्यातील १० मोरी येथील कॅनॉलवर नेला. मृतदेहाच्या कमरेला व पायाला दोरीने दगड बांधून मृतदेह कॅनॉलमध्ये फेकून दिला.

मात्र तब्बल ३ महिन्यानंतर ह्या गुन्ह्याचा उलघडा झाल्याने पंढरपूर पोलिसांचे कौतुक होत आहे. आरोपींना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांना १ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपास पंढरपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम करत आहेत.

हेही वाचा - भाच्यानेच मामाचा तलवारीने चिरला गळा; एकास अटक, दुसरा फरार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.