ETV Bharat / state

'प्रत्येक मतदान केंद्रावर असणार आरोग्य कर्मचारी'

जिल्हाधिकारी शंभरकर यांनी सांगितले, की निवडणूक आयोगाने कोरोनाच्या संसर्गाच्या अनुषंगाने आवश्यक उपाययोजना करण्याबाबत सूचना दिल्या आहेत. या सूचनांचे काटेकोर पालन होईल याकडे लक्ष द्यावे.

dm milind shambharkar
जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर
author img

By

Published : Nov 21, 2020, 10:08 PM IST

सोलापूर - महाराष्ट्र विधान परिषदेच्या पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या मतदानासाठी प्रत्येक केंद्रावर आरोग्य कर्मचारी नियुक्त केले जाणार आहेत. त्यासाठी सार्वजनिक आरोग्य, जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने नियोजन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज शनिवारी दिल्या.

निवडणूक आढावा बैठक -

जिल्हाधिकारी शंभरकर यांनी आज शनिवारी विधान परिषद निवडणूक मतदानाच्या तयारीचा आढावा घेतला. त्यावेळी त्यांनी या सूचना दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील बहुद्देशीय सभागृहात ही बैठक झाली. यावेळी पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीव जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख, पोलीस उपायुक्त बापू बांगर, आदी. उपस्थित होते.

हेही वाचा - 'राज्य सरकारने संभ्रमाची अवस्था निर्माण केली, हे सरकार आहे की छळवणुकीचे केंद्र?'

दिलेल्या आदेशाचे काटेकोर पालन व्हावे -

जिल्हाधिकारी शंभरकर यांनी सांगितले, की निवडणूक आयोगाने कोरोनाच्या संसर्गाच्या अनुषंगाने आवश्यक उपाययोजना करण्याबाबत सूचना दिल्या आहेत. या सूचनांचे काटेकोर पालन होईल याकडे लक्ष द्यावे. नियुक्त समन्वय अधिकारी यांनी सोपवलेली जबाबदारी पार पाडत असतानाच इतर विभागाशीही समन्वय ठेवावा. त्याचबरोबर अहवाल वेळीच द्यावेत.

मतदान केंद्राचे निर्जंतुकीकरण करावे -

मतदान केंद्रावर आवश्यक त्या सुविधा आहेत का? याची पाहणी करावी. मतदान केंद्रात स्वच्छता करुन घ्यावी. सॅनिटायझर फवारणी करून घ्यावी. मतदान केंद्राचे निर्जंतुकीकरण करून घ्यावे. सार्वजनिक बांधकाम विभागानेही पाहणी करावी. जिल्हा परिषद, सोलापूर महानगरपालिका आणि नगरपालिकेच्या शाळांमध्ये असणाऱ्या केंद्रात संबंधित प्रशासनाने आवश्यक सुविधा असल्याची खात्री करावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. तसेच निवडणूक प्रक्रियेत कामकाज करणाऱ्या आणि आरोग्य विभागाच्या कर्मचारी अधिकारी यांना प्रशिक्षण द्यावे. प्रशिक्षणादरम्यान शंका निरसन करावे, अशाही सूचना शंभरकर यांनी केल्या.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.