ETV Bharat / state

पंढरपुरात बनावट गुटखा जप्त, ६ जणांवर गुन्हा दाखल

अन्न व प्रशासन विभागाने पंढरपूर येथे गुटख्याची विक्री करणाऱ्या ठिकाणावर छापा टाकला. यामध्ये बनावट गुटखा जप्त करण्यात आला आहे.

पंढरपुरात बनावट गुटखा जप्त, ६ जणांवर गुन्हा दाखल
author img

By

Published : Aug 26, 2019, 10:33 AM IST

सोलापूर - राज्यात गुटखा बंदी असल्यामुळे विक्री करण्यासाठी तयार करण्यात येणाऱ्या गुटख्यावर छापा टाकून गुटखा जप्त करण्यात आला आहे. पंढरपूर येथे अन्न व औषध प्रशासनाने २५ ऑगस्टला बनावट गुटखा तयार करण्यासाठी वापरण्यात येणारा कच्चा माल ताब्यात घेतला आहे. तसेच ६ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

कारवाईमध्ये गुटखा तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य व नकली गुटखा जप्त केला आहे. यासोबतच गुटखा घेऊन जाणारी दोन वाहने जप्त केली होती. अन्न व सुरक्षा अधिकारी योगेश देशमुख यांनी पंढरपूर शहर पोलीस ठाणे येथे हजर होऊन पोलिसांनी पकडलेल्या दोन्ही वाहनाची पंचांसमक्ष तपासणी केली. यावेळी गुटखा बनविण्यासाठी वापरण्यात येणारा विविध प्रकारचा कच्चा माल, विविध कंपन्यांचे लेबल व मशिनरिज असल्याचे आढळले. या प्रकरणात मुख्य आरोपी राजेश नरसिंग पांडव हा कोल्हापुरातील हातकणंगले तालुक्यातील अळते गावचा रहिवासी आहे. राजेश पांडव हा गेल्या अनेक दिवसांपासून बनावट गुटखा तयार करून वेगवेगळ्या कंपन्याच्या नावाने पाकिटात भरून विक्री करत असल्याची कबुली त्याने दिली. यामध्ये गोवा १०००, किंग गुटखा, बादशाह गुटखा व सैराट गुटखा अशा विविध कंपनीच्या पाकिटात पॅक करून त्याची विक्री केली जात होती.

गुटख्याच्या या व्यवसायात मोहोळ तालुक्यातील अमर मुजावर हा मदत करतो. विविध कंपन्याचे रिकामी पाकिट पुरवण्याचे काम हा अमर मूजावर करीत असून त्यामध्ये मागणीप्रमाणे बनावट गुटखा भरून पूरवठा केला जात असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात गुन्ह्यातील मुख्य आरोपी राजेश पांडव आणि अमर मुजावरसह ६ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Intro:mh_sol_04_gutakha_raid_7201168
'सैराट' ची पंढरपूरात जप्ती , 'किंग' 'बादशहा' या नावाने विक्री होणाऱया बनावट गूटख्याची जप्ती
सोलापूर-
राज्यात गुटखा बंदी असल्यामुळे राज्यात विक्री करण्यासाठी तयार करण्यात येणाऱ्या गुटख्यावर धाड टाकून गुटखा जप्त करण्यात आला आहे. पंढरपूर शहरात अन्न व औषध प्रशासनाने धाड टाकून बनावट गुटखा तयार करण्यासाठी वापरण्यात येणारा कच्चा माल ताब्यात घेतला असून तिघांजणावर गून्हा दाखल केला आहे. Body: २५ऑगस्ट २०१९ रोजी पंढरपूर शहर पोलिस प्रशासन व अन्न व औषध प्रशासन विभागाच्या संयूक्त पथकाने पंढरपूरात कारवाई केली. या संयुक्त कारवाईत गुटखा तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य व नकली गुटखा जप्त केला आहे. पंढरपूर पोलिसांनी गुटखा घेऊन जाणारी दोन वाहन जप्त केली होती. अन्न सुरक्षा अधिकारी योगेश देशमुख यांनी पंढरपूर शहर पोलिस स्टेशन येथे हजर होऊन पोलिसांनी पकडलेल्या दोन्ही वाहनाची पंचांसमक्ष तपासणी केली असता त्यात गुटखा बनविण्यासाठी वापरण्यात येणारा विविध प्रकारचा काच्चा माल, विविध कंपन्यांचे लेबल व मशिनरिज असल्याचे आढळले.
या प्रकरणात मुख्य आरोपी राजेश नरसिंग पांडव हा कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालूक्यातील अळते गावचा रहिवासी आहे. राजेश पांडव हा मागील अनेक दिवसापासून बोगस गुटखा तयार करून वेगवेगळ्या कंपन्याच्या नावांने पाकिटात भरून तो विक्री करत असल्याचे त्यांने सांगितले आहे. यामध्ये गोवा १०००, किंग गुटखा, बादशाह गुटखा व सैराट गुटखा अशा विविध कंपनीच्या पाकिटात पॅक करून त्याची विक्री केली जात आहे.
गुटख्याच्या या व्यवसायात मोहोळ तालूक्यातील अमर मुजावर हा मदत करतो. विविध कंपन्याचे रिकामी पाकिट पूरविण्याचे काम हा अमर मूजावर करीत असून त्यात मागणी प्रमाणे बोगस गुटखा भरून बोगस तयार मालाचा पूरवठा केला जात असल्याचे समोर आले आहे.
या प्रकरणात गुन्ह्यातील मुख्य आरोपी राजेश पांडव आणि अमर मुजावर व त्यांच्या सहा साथीदारावर गून्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय दंड संहिता कलम १८८,२७२,२७३ व ३२८ त्याचप्रमाणे अन्न सुरक्षा व मानके कायद्याचे कलम ५९ अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Conclusion:null
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.